Sunita Kejriwal, Delhi : "पीएम मोदींनी (PM Narendra Modi) माझे पती अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवले. हे त्यांनी योग्य केले आहे का? हे भाजपावाले म्हणतात अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत. त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे. पण यांना माहिती नाही की, आमचे केजरीवाल शेर आहेत. हे जास्त दिवस त्यांना तुरुंगात ठेऊ शकणार नाहीत. करोडो लोकांच्या ह्रदयात केजरीवाल आहेत. ते धाडसाने देशासाठी लढत आहेत. अनेकदा मला वाटत की, स्वातंत्र्याच्या लढ्यात ते एक स्वातंत्र्य सैनिक होते आणि देशासाठी लढता लढता शहिद झाले. या जन्मातही त्यांना भारत मातेसाठी संघर्ष करण्यासाठी पाठवण्यात आले आहे", असं अरविंद केजरीवाल (Sunita Kejriwal) यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल म्हणाल्या. दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
सोनिया गांधींना सुनिता केजरीवाल यांना दिला आधार
दिल्लीतील या सभेतून काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत निषेध व्यक्त केला. दरम्यान, या सभेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांची आधार देत विचारपूस केले. इंडिया आघाडीच्या या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी, एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
केजरीवाल यांना तुरुंगातून कोणता संदेश पाठवला?
सुनिता केजरीवाल (Sunita Kejriwal) म्हणाल्या केजरीवाल यांनी तुरुंगातून आपणा सर्वांना संदेश पाठवलाय. केजरीवाल यांचा संदेश पाठवताना सुनिता केजरीवाल म्हणाल्या, तुम्हा सर्वांना मी नमस्कार करतो. मी आज तुम्हाला मलाच वोट करा असं सांगत नाही. आगामी निवडणुकीत तुम्हाला कोणाला पराभूत करण्यासाठी किंवा विजयी करण्यासाठी आवाहनही करत नाही. मी 140 कोटी देशवासीयांना भारतासाठी सहयोग देण्याची आवाहन करत आहे. नव्या भारत बनवण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. भारत महान देश आहे. आपली संस्कृती फार काळ पूर्वीची आहे. तरीही आपल्या देशात लोक अशिक्षित का आहेत? गरिब का आहेत? असा सवाल केजरीवाल यांनी तुरुंगातून पाठवलेल्या संदेशातून केला आहे.