नागपूर : जेव्हा अजित दादा स्वतः म्हणत असतील की काही लोक नाराज आहे, तेव्हा त्याच्यापेक्षा अधिक काय पाहिजे. हा एवढा मोठा पुरावा त्यांनी दिला आहे. यांना जनतेचे काय घेणे देणे नाही. या सरकारमध्ये काय गडबड सुरू आहे याच्यातून स्पष्ट होतंय. महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी आहे. आपसात लढून कार्यक्रम संपणार आहे. तसेच मलाईदार खात्यांकरता लढाई लांब चालली आहे. हिवाळी अधिवेशनात हे खातेवाटप करू शकले नाही. जनतेसाठी हे सरकार काहीच करू शकले नाही. आता पालकमंत्र्यासाठी कोणते जिल्हे घ्यायचे याची भांडण होतील. असा दावा करत काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी महायुतीवर टीका केली आहे.
मरकडवाडीमध्ये तेथील जनतेच्या मागणीनुसार बॅलेटवर मतदान झाले पाहिजे. हे सरकार जनतेमुळे नव्हे तर निवडणूक आयोग आणि केंद्रातील आकांमुळे आले आहे. जनतेचे मते यांनी चोरले. कालच निवडणूक आयोगाकडून नोटिफिकेशन काढण्यात आले. निवडणूक आयोगाकडून आता कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही. याचा अर्थ दाल में कुछ काला है. असेही नाना पटोले म्हणाले.
....तेव्हा भाजपचे मूळ असलेले लोक इंग्रजांबरोबर बरोबर होते
राहुल गांधी यांचा दौरा आलेला आहे. ते नांदेडला जाणार आणि तिथून बाय रोड परभणीला जाणार आहेत. त्याच्यात आम्ही काही सुधारणा करू पाहतो आहे. डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असे वाटत आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर टीका केली होती. त्यावर नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिले आहे. नौटंकी की हिटलरशाही? महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकारच्या माध्यमातून जी हुकूमशाही लोकशाहीत वापरल्या जात आहे. जनता आपले प्रश्न मांडण्यासाठी येते तेव्हा त्यांना कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला जीवे मारण्यात येतं, गुन्हे दाखल करण्यात येतात. या हुकूमशाही आणि हिटलरशाहीच्यामध्ये कोणी येत असेल, देशातील विरोधी पक्ष नेता येत असेल आणि त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नौटंकी म्हणत असेल तर भाजप लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी पार्टी आहे. ज्यावेळी इंग्रजांचं सरकार होतं तेव्हा भाजपचे मूळ असलेले लोक इंग्रजांबरोबर बरोबर होते. असेही नाना पटोले म्हणाले.
जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत- नाना पटोले
उद्धव ठाकरे नुकतेच नागपूर विधानभवनात मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणून राजकीय चर्चा सुरू केली. माध्यमांनी राजकीय चर्चा करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे. विदर्भाच्या तोंडाला पाने पुसून ही लोक गेली आहेत. कोण कोणाला कुठे भेटला यापेक्षा जनतेचे प्रश्न काँग्रेसला महत्त्वाचे आहेत, असे म्हणत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात अधिक बोलणे टाळले आहे. मागील वेळेस 20 हजार कोटीच बजेट अजित पवार यांनी मांडला होता. येणारा बजेट आणखी किती तुटीचा असणार आणि त्याचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर पाडून महागाई वाढवणार. निवडणूक आयोगाच्या कृपेने बहुमतात सरकार आले. ते जनतेच्या कृपेने आलेले नाही. महागाई, शेतकरी यासाठी काय करणार? अनुशेष कशावरून काढणार की केवळ मूठभर लोकांना फायदा होईल. हे संवेदनाहीन आणि लूट करणारे सरकार असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
हे ही वाचा