एक्स्प्लोर

Nana Patole : शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडांना वेळीच आवरा, नाहीतर...; नाना पटोलेंचा इशारा

Nana Patole on Sanjay Gaikwad : राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड केल्याने काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.

मुंबई :  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. यानंतर राज्यातील काँग्रेस (Congress) नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावरून संजय गायकवाड यांच्यासह महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  

नाना पटोले यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा. ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्यानं राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसं गायकवाडनं आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. 

राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?

नाना पटोले यांनी पुढे म्हटलंय की, पहिले भाजपचा एक नेता पक्षाचा झेंडा हाती घेऊन देशाच्या विरोधीपक्ष नेत्याला जीवे मारण्याची धमकी देतो. दुसरे भाजपचा नेता आणि मंत्री राहुल गांधींचा उल्लेख दहशतवादी म्हणून करतात. यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह मूग गिळून गप्प बसतात आणि आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातला गुंड प्रवृत्तीचा आमदार देशाच्या विरोधी पक्षनेत्याची जीभ कापून टाकण्याची भाषा करतो. यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडलीच पाहिजे. या राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? लोकशाही मानता की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पंजा काय करेल हे कळणारही नाही

संजय गायकवाड, तोंडाला आवर घाला नाहीतर पंजा काय करेल हे कळणारही नाही. आधी तुमची लायकी आहे का संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची? हे एकदा पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा. जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. 

आणखी वाचा 

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत धसांचं मोठं वक्तव्यABP Majha Headlines : 08 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : महाराष्ट्रातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा  : 03 February 2025 : ABP MajhaTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget