नागपूर : आगामी लोकसभा (Loksabha) आणि विधानसभा (VidhanSabha) निवडणुका महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र मिळून लढवणार असल्याचा विश्वास मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केलाय. पण अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंनी थेट प्रतिक्रिया देणं टाळल्याचं देखील यावेळी निदर्शनास आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगीमी निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या जागाही आम्ही लढवू असं म्हटलं. दरम्यान यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नसल्याचं पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अध्यक्षतेत शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल झाले आहेत. त्याचप्रमाणे गंगाधरराव फडणवीस स्मृती डायग्नोस्टिक सेंटरच्या भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी देखील मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत. पण मुख्यमंत्री शिंदे यांना नागपुरात पोहचण्यास बराच उशीर झाला. त्यातच तिकडे राष्ट्रपतींचा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाचा कार्यक्रम सुरू ही झाला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे ष्ट्रपतींच्या कार्यक्रमात पोहोचू शकतील याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. म्हणून मुख्यमंत्री शिंदे विमानतळावर उतरल्यावर तातडीने कार्यक्रमाच्या दिशेने रवाना झाले.
त्याच अनुषंगाने अजित पवारांचे भाष्य - मुख्यमंत्री शिंदे
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून लढवणार आहोत. तसेच लोकसभेत राज्यातून 45 जागा जिंकून देणार आहोत. एकजुटीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन लोकसभेची निवडणूक आम्ही लढू आणि त्याच्या अनुषंगाने अजितदादांनी भाष्य केलं आहे. पुढच्या सर्व निवडणुका आम्ही महायुती म्हणून मिळूनच लढू. 2024 मधील विधानसभा निवडणूक ही महायुती मिळूनच लढेल, असं म्हणत अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही प्रकारची थेट प्रतिक्रिया दिली नसल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांनी काय म्हटलं ?
"आपल्याकडे असणाऱ्या चार जागा बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या आपण लढवणार आहोतच. परंतु इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहेत त्याच्यात पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असेल तर तिथं भाजप आणि शिंदे साहेबांशी चर्चा करून आपल्याला जागा वाटप करता येईल" असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा :
मोठी बातमी! महायुतीतल्या बारामती, सातारा, रायगड, शिरूरच्या जागा अजित पवार गट लढवणार