मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना प्रत्युत्तर दिलं. धनंजय मुंडे यांनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena) यांना भेटण्यासाठी हिंगोलीतील (Hingoli farmer) शेतकरी मातोश्री दाखल झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा ठाकरेंनी ऐकून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, ठाकरेंना धनंजय मुंडेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला. 


एका घरात बसावं आणि सांगावं (Uddhav Thackeray on Dhananjay Munde)


उद्धव ठाकरे म्हणाले, "धनंजय मुंडेंनी कुठल्यातरी एका घरात बसावं आणि सांगावं मदत कशी करणार?"


धनंजय मुंडे काय म्हणाले होते? (Dhananjay Munde on Uddhav Thackeray)


धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमधील शिबिरानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता."कोरोना काळात उद्धव ठाकरे कुठे बसून काम करत होते हे देशाला माहिती आहे. आम्ही काही काळ उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. तुम्हाला जेवढं वाचाळ बोलता येतं आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असं धनंजय मुंडे म्हणाले होते.  


हिंगोलीचे शेतकरी मातोश्रीवर (Farmers at Matoshree)


पीक कर्ज परतफेड (crop insurance) करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अवयव विक्री करण्याचे ठरवलं होतं. अवयव विक्रीचं रेटकार्ड त्यांनी जाहीर केलं होतं हे शेतकरी मुंबईला दाखल झाले होते. मातोश्रीवरून या शेतकऱ्यांना काल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना आझाद मैदान पोलीस चौकीमध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र आज ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी पोलिसांना भेटून चौकशी केली. त्यानंतर या शेतकऱ्यांची मुक्तता करण्यात आली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटीसाठी बोलावलं. यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या व्यथा मांडल्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


उद्धव ठाकरे म्हणाले, "आज आपली पत्रकार परिषद ठरली नव्हती. संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो.हे कुठे गेले याचा शोध घेत होतो.तर अटक केली गेली. यांचा काय गुन्हा होता? का अटक केली? अवकाळी पाऊस झाला होता म्हणून पत्रकार परिषद घेतली. दुसऱ्याच्या घरात धूणीभांडी करायला गेलेले हे नालायक आहे हा शब्द त्यांना लागला.त्यांना काय करायचं त्यांनी यावर करावं. 


सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी


मी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे न्या. पंचनामे आधीचे आणि आत्ताचे कधी केले ते पाहा. हा घोटाळा आहे का? याची मला शंका येत आहे. सरकारनं मोठे पैसे विमा कंपन्यांना दिले आहे. हा पैसा कोणाच्या खिशात गेलाय? शेतकऱ्यांना पीक विमा दिला त्याबद्दल त्यांना कितीचे पैसे मिळतायत? कर्जमुक्ती मी केलेली तेव्हाचे तुम्ही साक्ष आहात. सरसकट नुकसान भरपाई द्या. किंवा पुन्हा कर्जमुक्ती द्या. सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


आत्महत्येचा विचार करु नका


आचारसंहिता लागेल आणि भाजपचे लोकं तुम्हाला आश्वासने देतील. गॅसचे दर निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर पुन्हा वाढले आहेत. शेतकरी म्हणून तुम्ही देखील उभे राहा. ही जाणीव नसेल तर ती ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. आत्महत्येचा विचार करु नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं.


सरकार सर्व विकतंय


हे सरकार सर्वच विकत आहे, तुमचे अवयव तुम्ही विकणार असेल तर त्यांना नको आहे का? मी अन्नदात्याची व्यथा समोर आणावी म्हणून बोललो. पंतप्रधान फसल विमा योजना हा घोटाळा आहे. पारदर्शकता असेल कर विमा कंपन्या गेल्या कुठे? कंपन्या गेल्या कुठे? कोणाला पैसा पोहोचवतात?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 


नालायक शब्द बरोबर लागला


नालायक शब्द हा त्यांना बरोबर लागला आहे. मला शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं आहे. पंचनाम्यात न पडता मदत करा. मंत्रिमंडळात देखील काय केलं? पंचनामे करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.  


शेतकरी काय म्हणाले?


आम्ही राज्य सरकारचा जाहिर निषेध करतो. शेतकरी अवयव विकण्यासाठी येत असेल आणि सरकार मदत करत नसेल आणि त्यांना अटक करत असेल तर त्यांचा निषेध. सरकार पिकाला भाव द्यायला तयार नाही. बँकेचं पीक कर्ज भरलं जात नाही. आम्ही आमचं वयैक्तिक अवयव गहाण ठेवले. ३ लाख कर्ज आहे आणि त्या हिशोबाने आम्ही अवयव विकत होतो. सरकारनं काल आम्हाला पोलिस स्टेशनला नेलं. 


ठाकरेंना भेटलो, शेतकऱ्यांच्या पाठीमागे कोणीतरी आहे याचा आनंद आम्हाला वाटला. वाशिम हिंगोली जिल्ह्यातील पिकं उद्धवस्त झाली आहेत. आत्महत्या करण्याऐवजी जगून आम्ही जर अवयव विकत असेल तर गैर काय? मी दोन लाखांचे कर्ज काढलं, तीन लाख आता कर्ज झालंय. कर्जाचा बोजा आम्हाला अधिक झालाय. आम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला, मात्र मग कोणी दखल घेतली नाही. म्हणून अवयव विकण्याचा निर्णय घेतला.


आमचं घर गहाण आहे, सर्व गहाण आहे. उद्धव साहेबांकडे आलो तेव्हा त्यांनी आम्हाला धीर दिला. आम्हाला सरकारकडून अपेक्षा होती. आमचे कर्ज माफ होईपर्यंत मुंबई सोडणार नाही. ७५ टक्के शेतकरी फडणवीस यांच्या काळात पात्र झालो नाही. मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात आम्ही पात्र झालो होतो. एका शेतकऱ्याला एक रुपया, दोन रुपया विमा आला. मागच्या वर्षी तीन हेक्टरची मर्यादा ठेवली. मात्र काही शेतकऱ्यांना विमा खूपच कमी मिळाला. शेतकऱ्यांना न्याय तरी मिळाला पाहिजे.
मरणोत्तर तरी कर्जमाफी मिळाली पाहिजे. पावसामुळे सोयाबीन कापूस गेला आहे. आमच्या पत्नी आणि लेकराबाळांनी देखील गावाकडे आता अवयव विकण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकार असल्याने वाशिमला कोणतीही मदत मिळत नाही, असं शेतकरी म्हणाले.  


VIDEO : उद्धव ठाकरे यांचा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल 



संबंधित बातम्या