रायगड : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.  महायुतीत लोकसभेच्या चार जागा  अजित पवार गट लढवणार असल्याचे आज अजित पवारांनी जाहीर केले आहे. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.  सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत


अजित पवार म्हणाले,   मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत
बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात  या  सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत


अजित पवार म्हणाले,  काही जण आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले . मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेलं पण ते आरोप सिद्ध झाले नाही.  मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. राज्यात ते सातत्याने भारनियमन 2012 रोजी होत होतं ते आम्ही बंद केलं. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे. सहा लाख कोटींचं बजेट आहे. 


मी कमीटमेंट पाळणारा नेता : अजित पवार


माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. 32 वर्ष मी काम करतोय मला विचारलं जातं माझ्यावरच आरोप का होतात. परंतु  मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे.  माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. 


विकासकामाच्या बाबतीत जिल्हाध्यक्षांना प्राधान्य : अजित पवार


विकासकामांच्या बाबतीत पहिलं प्राधान्य राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, दुसरं खासदारांना तर तिसरं राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना असणार आहे.    युवती संघतेनेत काही वाद आहेत ते अदिती तटकरेने ते वाद मिटवावेत त्यामुळं युवती विभागाची जबाबदारी घे. जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवायला संधी मिळेल, असे देखील अजित पवार म्हणाले. 


उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्नशील : अजित पवार


सध्या असलेल्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी चर्चा करून लवकरत लवकर निर्णय घेणार आहे. आम्ही राहिलेल्या मंत्र्याबाबत देखील पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  इतर नेत्यांसोबत लवकरच या विषयांवर बसणार आहे. 


आपण  आपली विचारधारा सोडलेली नाही : अजित पवार


अनेक वर्ष संघटनेत काम करत आहोत. 2004 साली जे घडलं होतं ते मला काल कळलं. आधीच्या जनसंघाबाबत बोलल जातं होतं की जातीयवादी पक्ष आहे त्यामुळं आपण भाजप शिवसेनेपासून लांब राहत होतो. आता काळ बदलला आहे. अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले. आपण आपली विचारधारा सोडलेली नाही. मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो. आपण भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी जो विचार सांगितला त्याचं मार्गावर चाललो आहे.


दिलेला शब्द पाळा कोणाला नाराज करू नका : अजित पवार


10 जून 1999 पवार साहेबांनी या पक्षाची घोषणा केली तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त समर्थन, पुढाकार महाराष्ट्रातून होता. मी जरी संघटनेचा पदाधिकारी त्या काळात नसलो तरी संघटनेचं काम कोण करत होतं हे सगळ्यांना माहिती आहे. राज्यात पक्षाच्या इमारती उभारण्याचं काम आम्ही केलं. 2019 मधे प्रकाश साळुंखेंना मंत्री व्हायचं होतं, ते नाराज होते. प्रकाश साळुंखे राजीनामा देण्याच्या तयारीत होते. त्य़ांना मी, जयंत पाटील यांना खूप समजावलं, त्यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी जयंत पाटील म्हणाले मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, काम करतो मग तुम्हाला जबाबदारी देऊत्यानंतर मी जयंत पाटलांना आठवण करून दिली.  मात्र जयंत पाटील पुढे ढकलत राहिले..मंत्रीपद ठेवा आणि अध्यक्षपद यांना द्या. मी म्हणतो एकदा शब्द दिला की तो पाळा ना..कुणाला नाराज करू नका, संघटनेसाठी केलेल्या या बारिक बारिक गोष्टी साठत राहतात आणि मग त्यांचा अशा पद्धतीने उद्रेक होतो.


कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका.. अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी


महिनाभरात तुम्ही सगळ्या गावपातळीवरील पदाधिकारी नेमण्याची जबाबदारी तुम्हाला दिली आहे.एक महिन्यात तुम्हाला हे सगळं पूर्ण करायचं आहे. आपल्याला जास्तीचं काम करायचं आहे.आत्मचिंतन करा की आपण कुठे जातो आहे. फ्रंटलच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कार्यालयात बसण्यापेक्षा आपापल्या ठिकाणी राहा. मी आता आठवड्यातील तीन दिवस मुंबईत राहील, एक दिवस पुण्यात राहणार आहे. पुण्याचे साडे तीन खासदार..(बारामती, शिरूर, पुणे) पक्षांतर्गत लॉबिंग अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. किमान समान कार्यक्रम पाळून आपण सत्तेत सहभागी झालो आहोत. आपला मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत.  कोर्ट कचेऱ्यांमध्ये तुम्ही लक्ष देऊ नका...लक्ष देणारे लक्ष देतील. 


कुटुंब नियोजन केले पाहिजे


काही गोष्टी आपल्याला पटत नसल्या तरी पटवून घ्याव्या लागतात.  20 वर्षांनी जेव्हा आपण 160 कोटीचा देश होऊ तेव्हा जगातला सगळ्यात ज्येष्ठांचा देश भारत होईल. एक किंवा दोन अपत्यांवर आपण थांबलं पाहिजे यासाठी मोदी साहेबांनी काय कायदा करावा तो करावा. कुटुंब नियोजन केले पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी चालेल वंशाचा दिवा मुलगाच असतो असं काही नसते मुलीच सगळ करतात. पण काहींनाच असं वाटत. समान नागरी कायदा म्हणजे प्रत्येकसाठी एकच कायदा...तुमच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावणार नाही