एक्स्प्लोर

Mumbai Pune Express Way: जे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालं, तेच अटल सेतूवरही घडू शकतं, मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुचवला उपाय

Mumbai Pune Express Way: अटल सेतूवर कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Mumbai Pune Express Way: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटात आडोशी बोगद्यानजीक झालेल्या गॅस टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर, अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावा शेवा सेतू (अटल सेतू) वर भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विधान परिषदेतील शिवसेना (ठाकरे गट) आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अटल सेतूवर सक्षम आपत्कालीन यंत्रणा आणि हेलिपॅडसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी नार्वेकर यांनी पत्रात केली आहे.

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाटातील आडोशी येथे 3 फेब्रुवारी रोजी मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर अति-ज्वलनशील प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. तब्बल 36 तासांनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या काळात वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे मुंबई–पुणे महामार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नसल्याचे स्पष्टपणे समोर आले, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे.

Atal Setu: अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक

या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अटल सेतूवरील आपत्कालीन व्यवस्थेचा सखोल आढावा घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील शिवडी येथून नवी मुंबईतील न्हावा शेवाला जोडणाऱ्या अटल सेतूची एकूण लांबी 21.8 किलोमीटर असून, त्यापैकी 16.5 किलोमीटर भाग समुद्रावर तर 5.5 किलोमीटर भाग जमिनीवर आहे. हा सेतू 12 जानेवारी 2024 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Atal Setu: हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे गरजेचे 

अटल सेतूमुळे मुंबई–नवी मुंबई प्रवासाचा कालावधी एका तासावरून अवघ्या 20 मिनिटांपर्यंत कमी झाला असून, त्यामुळे या पुलावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय, अटल सेतूच्या आसपास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प सुरू असल्याने, येथे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठा अपघात, आग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे हे मोठे आव्हान ठरू शकते. त्यामुळे अटल सेतूवर सुसज्ज आपत्कालीन यंत्रणा, तातडीची मदत व्यवस्था आणि हेलिपॅडसारख्या सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे नार्वेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

Atal Setu: अटल सेतूवर दुर्घटना घडली तर...

टँकर अपघाताच्या दिवशी आपण मुंबईपुणे द्रुतगती महामार्गावरून बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी जात होतो, आणि त्या वेळी निर्माण झालेली गंभीर परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. अशीच घटना अटल सेतूवर घडल्यास भीषण परिणाम होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा 

Dadar Market: दादरच्या मार्केटमध्ये फेरीवाल्यांना उठवण्यासाठी भाजपच्या अक्षता तेंडुलकरांनी सायरन लावून रुग्णवाहिका फिरवली, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party BCI: कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
कॉकरोच जनता पार्टीचा आणखी एक विजय! बार कौन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला 'तो' निर्णय अखेर मागे, नालसारच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget