एक्स्प्लोर

Sanjay Jadhav: मोठी बातमी: खासदार संजय जाधव उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? 'त्या' विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले, 'सध्याची परिस्थिती...'

Sanjay Jadhav: परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

Sanjay Jadhav: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या अनेक भूकंप होत असतानाच आता परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे जाधव आता वेगळी वाट धरणार का? अशा चर्चांना परभणीत (Parbhani News) उधाण आले आहे.

Sanjay Jadhav: नेमकं काय म्हणाले संजय जाधव?

परभणीतील एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार संजय जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय भविष्याबाबत सूचक विधान केले. ते म्हणाले, "मी ज्यांच्यामुळे मोठा झालो त्यांचा कधीही विश्वासघात करणार नाही, पण सध्याची परिस्थिती बदललेली आहे. निवडणुकीत आर्थिक गणित महत्त्वाचं असतं, त्यामुळे पुढे काय होईल सांगता येत नाही." जाधव यांच्या या विधानातील 'आर्थिक गणित' आणि 'बदलेली परिस्थिती' या दोन शब्दांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी थेट पक्षांतराचे नाव घेतले नसले तरी, भविष्यात ते 'परिस्थितीनुसार' मोठा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत यातून मिळत आहेत.

Sanjay Jadhav: शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा

मागील काही दिवसांपासून संजय जाधव हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत. या चर्चांना त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे अधिक बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, पत्रकारांनी यावर त्यांची भूमिका विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर अधिक भाष्य करणे टाळले, ज्यामुळे संभ्रम अधिक वाढला आहे.

Sanjay Jadhav: परभणीत राजकीय फेरबदलाची शक्यता?

संजय जाधव यांनी अद्याप पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, परभणीत ठाकरे गटाची मोठी ताकद असलेल्या जाधवांनी जर टोकाचा निर्णय घेतला, तर तो 'उबाठा' गटासाठी मोठा धक्का मानला जाईल. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या जाधव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार की शिंदे गट किंवा भाजपकडे वळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde: वर्क फ्रॉम होमवाले लोक मध्ये आले होते..; मिसिंग लिंकचे लोकार्पण, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, फडणवीसांचं कौतुक

उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जातायेत का? एकनाथ शिंदे म्हणाले मला काय फरक पडतो? त्यांना जवळ तर घ्यायाला पाहिजे

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget