एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे रॉकेट, शरद पवार सुतळी बॉम्ब तर राहुल गांधी लक्ष्मी तोटा, तानाजी सावंत नागगोळी, ओमराजेंनी फोडले राजकीय फटाके

एबीपी माझाच्या राजकीय फटाके या कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना रॉक्टेची उपमा दिली. तर तानाजी सावंत म्हणजे नागगोळी असा टोला त्यांनी लगावला.

Omraje Nimbalkar: उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणजे रॉकेट आहेत. ते सरळमार्गी आहेत. तर  आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणजे डबल धमाका आदली आहेत. खाली आणि वर सारखाच आवाज अशी उपमा शिवसेना ठाकरे गटाचे धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी दिली. एबीपी माझाच्या राजकीय फटाके या कार्यक्रमात ओमराजे बोलत होते. तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणजे नागगोळी, हातही काळा होतो आणि जमिनही असा टोला खासदार ओमराजे यांनी लगावला. 

पारंपारिक विरोधक असणाऱ्या आमदार राणा जगजीतसिंह पाटलांना ओमराजे निंबाळकरांनी भुई चक्करची उपमा दिली आहे. तर किरीट सोमय्या म्हणजे भुंगा फटाका असल्याचे ओमराजे म्हणाले. तर शरद पवार म्हणजे सुतळी बॉम्ब मोठा आवाज असल्याचे ओमराजे म्हणाले. तर राहुल गांधी म्हणजे लक्ष्मी तोटा ओरिजनल आवाज असल्याचं ओमराजे यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या राजकीय फटाके या कार्यक्रमात धाराशिवचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते. 

कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा?

यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी विविध नेत्यांनी फटाक्यांच्या उपमा दिल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये शरद पवारांना सुतळी बॉम्बची उमपा देण्यात आली. एकदा ठरवलं की ठरवलं. सुतळी बॉम्बचा आवाज मोठा असतो, या आवाजाला सघलेच घाबरतात असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी शरद पवारांची स्तुती केली. तसेच राणा जगजितसिंह पाटील यांना ओमराजे निंबाळकांनी भुई चक्करची उपमा दिल्याचं पाहायला मिळालं. पहिल्यांदा म्हणायचं अजित पवार यांनी खूप त्रास दिला म्हणून बंड केलं. परत म्हणायचे विकासासाठी भाजपमध्ये गेलो. परत लोकसभेची निवडणूक आली की पत्नीनं राष्टरवादीत प्रवेश करायचा आणि सांगायचा विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो. कायम स्वत:च्या स्वार्थासाठी यांची गोल भूमिका असते असेही ओमराजे म्हणाले.  तर किरीट सोमय्या म्हणजे भुंगा फटाका आहेत.  फक्त भुई भुई करायचं पण वस्तुस्थिती काहीच नसते असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुसका फटका

उद्धव ठाकरे म्हणजे रॉकेट आहेत. ते सगळमार्गी आहेत. जे बोललय ते करतात. जे केलंय तेच सांगतात. रॉकेटकडे बघितलं की उद्धव ठाकरेंची आटवण होते असे ओमराजे म्हणाले. आदित्य ठाकरे हे आदली आहेत. खालीपण आवाड मोठा आणि वर देखील आवाज मोठा होतो असेही ओमराजे म्हणाले. संघर्षाच्या काळात आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना चांगली साथ दिल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. मंत्री तानाजी सावंत यांना नागगोळीची उपमा दिली. हात पण काळे होतात आणि जमिनपण काळी होते असा टोला त्यांनी तानाजी सावंत यांना लगावला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फुसक्या फटाक्याची उपमा दिली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. सत्तेचा अंहकार त्यांना आल्याचे ओमराजे म्हणाले. 

राहुल गांधी लक्ष्मी तोटा, अमित शाह आणि फडणवीस कपटी फटाका

राहुल गांधी यांना लक्ष्मी तोट्याची उपमा दिली. आवाज खरा आणि खणखणीत असतो असे ओमराजे म्हणाले. राहुल गांधींची प्रतिमा भाजपकडून मलिन करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांनी भारत एकसंध राहण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे राहुल गांधी म्हणाले. भविष्य त्यांच्यासाठी चांगले आहे. जो कपटी फटाका आहे तो अमित शाह यांनी देता येईल असे ओमराजे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना देखील कपटी फटाका लागू होईल असे ओमराजे म्हणाले. पक्ष फोडणे, कट कारस्थान त्यांनी केले. या गोष्टी जनतेला आवडल्या नाहीत असे ओमराजे म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sattar vs Danve Special Report :सत्तारांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणतात, औरंगजेबानं धमकावू नयेPolitical Leaders Property Special Report :  संपत्तीवरून वाद,आरोपांची वात ; सात उमेदवार टार्गेटRashmi Shukla Special Report : शुक्लांना कधी हटवणार? पटोलेंचा सवालाचा बाॅम्बManoj Jarange Maratha Reservation :  मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
इंस्टावर पोस्ट शेअर करत संपवले जीवन; व्हिडिओत शिवसेना नेत्याच्या भावाचं नाव
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
काळमांडवी धबधब्यावर पर्यटनास गेलेले २ तरुण बुडाले; ऐन दिवाळीतच दु:खद घटना
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
ती माझी मैत्रीण; शायना एनसींकडून गुन्हा दाखल होताच खासदार सावंत यांची पहिली प्रतिक्रिया
Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
देवघरात आग लागली अन् स्वयंचलित दार लॉक; व्यापारी पती-पत्नी जिवंत जळाले, वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
बीडमधील 6 मतदारसंघात लढती ठरल्या, जरांगेंची जादू चालणार; महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Embed widget