एक्स्प्लोर

Navneet Rana : इकडे नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तिकडे अमरावतीसाठी भाजपनं प्लान B आखला; नव्या उमेदवारांची चाचपणी

Amravati Lok Sabha Election 2024 : खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे.

अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rane) जात प्रमाणपत्र (Caste Certificate) प्रकरणी निकाल येण्याआधीच अमरावतीसाठी भाजपचा (BJP) प्लॅन B तयार आहे. अमरावतीसाठी भाजपकडून नव्या उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. आचार संहिता लागण्यापूर्वीच खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. नवनीत राणा यांचा बनावट जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या बनावट जातप्रमाणपत्र प्रकरणी निकाल लागल्यानंतर त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणांना दिलासा मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

1 एप्रिलला बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी निकाल

खासदार नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिल रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. एक एप्रिलला निकाल लागल्यानंतर 2 एप्रिलला महायुतीकडून त्यांची उमेदवारी घोषित होणार अशी माहिती समोर येत आहे. त्यानंतर 4 एप्रिलला नवनीत राणा लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार अशीही विश्वसनीय सूत्रांकडून माहिती  समोर आली आहे.

नवनीत राणांना दिलासा मिळणार? 

आचार संहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांचा जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे. खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी महत्त्वाचा निकाल काही दिवसात लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने 108 पानाचा जजमेंट दिला आहे. त्यामध्ये  राणा यांचे सात ही जात प्रमाणपत्र खोटे ठरविले आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातू असून त्याचा निकाल 1 एप्रिलला लागणार आहे. आता या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

नवनीत राणाऐवजी 'या' उमेदवारांच्या नावाचा विचार सुरु

जर निकाल नवनीत राणा यांच्या विरोधात लागला तर भाजपाचा प्लान बी तयार असून अमरावती प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू आहे. त्या मूळच्या अकोला जिल्ह्याच्या आहे. तसेच दिगवंत रा.सु. गवई यांच्या कन्या कीर्ती गवई आणि एक माजी आयएएस अधिकाऱ्याचे नावही विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे.

अमरावतीची जागा घटक पक्षाला

अमरावती लोकसभेची जागा घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार नवनीत राणा ह्या पुन्हा युवा स्वाभिमान पार्टी कडूनच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. काही दिवसांपासून नवनीत राणा ह्या भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. पण अमरावतीची जागा ही घटक पक्ष असलेल्या राणा दाम्पत्य यांच्या युवा स्वाभिमान पार्टीला सोडण्यात आली आहे..

नवनीत राणा यांच्यावर आरोप काय? 

नवनीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bacchu Kadu : मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर बच्चू कडूंची नाराजी दूर होणार? नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget