Narayan Rane : कुडाळ मालवण येथून निलेश राणे (Nilesh Rane) आमदार म्हणुन निवडून आलेत. तर नितेश राणे(Nitesh Rane) देवगड, कणकवली वैभववाडीमधून निवडून आलेत आणि आज ते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. दोन चिरंचिव आमदार आणि वडील खासदार हे देशातील एकमेव उदाहरण असावं, असं मला वाटतं. यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय ऋणी आहे. दुसरा म्हणजे माझ्या आयुष्याचा आनंदाचा हा क्षण आहे, तो यासाठी की माझे दोन्ही पुत्र कर्तुत्वान निघावे हे भाग्य मला मिळालं.

Continues below advertisement


वडील मुलांचेंच कौतुक करताय अशातला हा भाग नाही. त्यांनी त्यांचं कर्तुत्व सिद्ध केलंय म्हणून मी आज हे म्हणतो आहे. असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी भर सभेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांचं कौतुक केलं आहे.


आम्हाला कधी कुणाच्या खिशात हात घालण्याची वेळ आली नाही-नारायण राणे 


एवढी वर्ष मी हे कधी बोललो नाही. दोन्ही मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं, हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यात निलेश तर वयाच्या पंधराव्या वर्षापासून परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. एम कॉम मग पीएचडी केली आणि त्यानंतर खासदार म्हणून निवडून आलेत. तर नितेश अमेरिकेहून लंडनला गेला त्याने तिथे एमबीए केलं. असं असताना त्यांना राजकारणातच यावं असं काहीही नव्हतं, त्यांना त्यांची मोकळीक होती. व्यवसायाची देखील संधी होती. आज आम्ही तिघेही आपला व्यवसाय सांभाळून राजकारणात सक्रिय आहोत. त्यामुळे आजही आम्हाला कुणाच्या खिशात हात घालण्याची वेळ येत नाही.


..म्हणून मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे- नारायण राणे 


मी 1990 साली राजकारणात आलो. त्यादिवसापासून  आजतगायत एकाही कॉन्ट्रॅक्टरने सांगावं की राणेंना पैसे नेऊन दिले, किंवा नितेश, निलेश राणे यांनी पैशांची मागणी केली. आज आम्ही जे आहोत ते स्व: कर्तृत्वाने आहोत.  त्यामुळे मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे, असेही माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले.



इतर महत्वाच्या बातम्या