देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Rain Alert : धो-धो कोसळणार! आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट
IMD Rain Forecast : देशासह राज्याच्या हवामानात (Weather Update) गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) दिसून येत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या (Maharashtra Rain Update) सरी बरसताना दिसत आहेत. राज्यात वीकेंडला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
Lok Sabha Election : रामटेक लोकसभेत काँग्रेसला आणखी एक झटका, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय; अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना 'वंचित'चा पाठींबा
Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघातील (Ramtek Lok Sabha Constituency) काँग्रेस पक्षाची (Congress Party) डोकेदुखी काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आधी रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यातच काँग्रेसचे नेते किशोर गजभिये (Congress Leader Kishore Gajbhiye) यांनी बंडखोरी करत लोकसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. असे असतानाच आता वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) मोठा निर्णय घेत काँग्रेसची चिंता वाढवली आहे. कारण काँग्रेसमध्ये बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या किशोर गजभिये यांना वंचितने पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...
Mahayuti Seat Sharing Dispute : आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदेसेनेची हाय व्होल्टेज बैठक
Mahayuti Seat Sharing Dispute : महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. कारण भाजपच्या (BJP) दबावामुळे शिंदेसेनेच्या अनेक खासदारांचे तिकीट (MP Candidacy) कापले गेल्याने पक्षातील नेत्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दरम्यान याचेच पडसाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी शनिवारी झालेल्या बैठकीत उमटताना पाहायला मिळाले आणि ही बैठक चक्क हाय व्होल्टेज बैठक ठरल्याची माहिती मिळत आहे. आमच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आले असून, त्यामुळे त्यांच्या दबावाला बळी पडू नका अशी भूमिका शिंदेसेनेच्या नेत्यांनी या बैठकीत घेतली. वाचा सविस्तर...
Ahmednagar : सुजय विखेंची प्रचारात आघाडी, निलेंश लंकेंच्या प्रचारासाठी मविआत समन्वय नाही?
अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारासाठी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी अक्षरशः पायाला फिंगरी बांधली आहे. जोरदार प्रचार सुरू उमेदवारांनी सुरू केला आहे. या प्रचार आतापर्यंत सुजय विखेंनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर...
Stock Grow Break Up Leave : ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह', 'या' कंपनीच्या नव्या धोरणाची चर्चा!
मुंबई : नोकरीवर असताना कर्मचारी वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्टी (लिव्ह) घेतात. कौटुंबिक तसेच इतर अडचणी समोर आल्यावर रितसर अर्ज करून या सुट्ट्या मिळवता येतात. याध्ये पगारी सुट्टी (अर्न लिव्ह), क्याज्युअल लिव्ह, ट्रॅव्हल लिव्ह, मॅटर्निटी लिव्ह, पॅटर्निटी लिव्ह असे सुट्ट्यांचे वेगवेगळे पर्याय कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असतात. आपल्या गरजेनुसार कर्मचारी या सुट्ट्या घेत असतो. मात्र कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगता येत नाहीत, पण त्या परिस्थितीत सुट्टी हवी असते. कर्मचाऱ्यांच्या याच अडचणीवर एका फिनटेक कंपनीने जबरदस्त तोडगा काढला आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट ब्रेकअप लिव्ह (Break Up Leave) देत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची लिव्ह घेतल्यानंतर पूर्ण पगार मिळणार आहे. वाचा सविस्तर...
हार्दिक पांड्याची मुंबई पहिल्या विजयासाठी उत्सुक, दिल्ली विजयाच्या पटरीवर परतणार का?
MI vs DC, IPL 2024 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली (mumbai indians vs delhi capitals ) विजयाची गाडी पटरीवर आणण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मुंबईला अद्याप पहिल्या विजयाची प्रतिक्षाच आहे. तर दुसरीकडे दिल्लीला चार सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे, त्यामुळे दिल्लीकडूनही विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील. आज आयपीएलमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना दुपारी तीन वाजता वानखेडे मैदानावर होणार आहे. वाचा सविस्तर...
Horoscope Today 7 April 2024 : आजचा रविवार ठरणार फलदायी! 'या' राशींना होणार आर्थिक लाभ; रखडलेली कामं होणार पूर्ण
Horoscope Today 7 April 2024 : पंचांगानुसार, आज 7 एप्रिल 2024, रविवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...