Sachin Ahir on Vijay Shivtare, Baramati :" मी सुप्रिया सुळे यांच्यासाठी मी बारामतीत येऊन बसणार आहे. राज्यात त्यांना विरोधी पक्ष ठेवायचा नाही. एकतर आमच्यासोबत या नाहीतर नेस्तनाबूत करायची भूमिका त्यांची आहे. निधी विरुद्ध निष्ठा अशी ही लढाई आहे. पुणे जिल्हा हा आमच्यासाठी दुष्काळी राहायला आहे. बापू तर काय बोलत होते. आम्हाला वाटलं की नवीन वाघ तयार झाला. पण पुढं काय झालं तुम्ही बघा", अशी टीका ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी विजय शिवतारे यांच्यावर केली. महाविकास आघाडीचा बारामतीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला.
यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होते. 


विधानसभा वेळी तुम्ही आमच्यासाठी बोलावे अशी आमची अपेक्षा


सचिन आहिर म्हणाले, काँग्रेसचे आमदार खासदार फोडण्याचे काम सुरू आहे. सगळं फोडले तर कुणीही हलायला तयार नाही. ज्याने आपल्या नेतृत्वाला खाली खेचण्याची काम केले आहे. त्याचा वचपा काढायचा आहे. बारामतीबाबत उद्धव ठाकरे यांच्या सूचना आहेत. विधानसभा वेळी तुम्ही आमच्यासाठी बोलावे अशी आमची अपेक्षा आहे, असंही आहिर यांनी सांगितले. 


जन्मापासून मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध पाहिले


सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादी पेक्षा सेनेचे कार्यकर्ते जास्त पळत आहेत. 18 एप्रिलला पुणे, शिरूर आणि बारामतीचा फॉर्म भरणार आहोत. मावळचा फॉर्म 23 ला भरणार आहोत. आपण मे महिन्यात मोठी सभा घेणार आहोत.  उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी चांगले काम केलं. मुख्यमंत्री म्हणून आज लोकांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मनात आहेत. माझ्या जन्मापासून मी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध पाहिले आहेत. माझ्या राजकारणातील सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली होती. एका हातात तुतारी आणि एका हातात मशाल आहे. अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. टोल काढून घेईल असे सांगत आहेत काय घ्यायचं आहे ते घे बाबा. माझ्या वर सगळ्यांचे लक्ष आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. 


शिवसेना नेहमीच राष्ट्रहिताला प्राधान्य देते. शिवसेनेच्या कामाची दिल्लीतही चर्चा असतो. शिवसेना दिल्लीसमोर झुकत नाही. जिथं राष्ट्रचा हिताचा निर्णय येतो तिथे शिवसेना तडजोड करीत नाही. बाळासाहेब ठाकरे आणि मी जेवढ एकमेकांवर जेवढे उत्तम शब्द वापरता येतील तेवढे वापरायचो, असं शरद पवार म्हणाले. 


Sanjay Raut on Hasan Mushrif : शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर