Sandeep Deshpande Tweet : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) राजकीय तणाव वाढत आहे. एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होत असताना आज शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला शिवसेनेचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. एकंदरीतच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. मनसेचे संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी देखील एक सूचक ट्विट केलं आहे, त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता तुम्हीच पाहा हे काय ट्विट आहे? आणि तुम्हीच ठरवा, याचा काय अर्थ घेता येईल?


राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेकडून 'ते' ट्विट व्हायरल


मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एक ट्विट केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या ट्विटवर सध्या लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. आता तुम्हीच पाहा हे काय ट्विट आहे? आणि तुम्हीच ठरवा, याचा काय अर्थ घेता येईल?






संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले...


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात 25 हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसेच किरीट सोमय्या यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू.  आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली." . 


संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा


शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने आरोप होत आहेत. ईडीकडे काही नेत्यांची भाजप नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात असून त्यांच्याविरोधात इतरही आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्या प्रकरणी ईडीने अटक केली. त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यासाठी ईडीकडून धमकी दिली जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते.



 


काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्ही खूप सहन केलं, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला आव्हान दिलं होतं. राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेला पक्षाचे पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी सोमवारी म्हटलं होतं.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha