Lalu Yadav Fodder Scam : राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Yadav) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चारा घोटाळ्यातील पाचवे सर्वात महत्वाच्या दोरांडा (Doranda) कोषागार प्रकरणी रांचीतील विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवलं आहे. तसेच या प्रकरणातील 24 जणांना न्यायालयाने दिलासा देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी 21 फेब्रुवारी रोजी लालू यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 1996 सालापासून सुरू असलेल्या या खटल्याचा तब्बल 26 वर्षानंतर निकाल लागला आहे.  


जवळपास 950 कोटी रुपयांचा हा घोटाळा लालूंसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. आतापर्यंत या घोटाळ्याशी संबंधित 5 प्रकारणांमधील 4 प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. हे प्रकरण 1996 साली समोर आले होते. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर लालू यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. 1970 साली बिहारचे मुख्यमंत्री असलेले जगन्नाथ मिश्रा यांच्यावरही या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप लावण्यात आला होता.  


काय आहे दोरंडा प्रकरण?


1990 ते 1995 साला दरम्यान दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोळयातील सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. याप्रकरणातील एकूण 99 आरोपींवर अद्यापही निर्णय येणे बाकी आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha