Sandeep Deshpande & Nitesh Rane: मनसेची हिंमत असेल तर त्यांनी भेंडीबाजार, नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारुन दाखवावं, असे वक्तव्य करणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मनसेचे मुंबई विभागप्रमुख संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या लोकांना मराठीतील 'श'चा उच्चार करता येत नाही, ते भाजपमधील नेते मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यासाठी फूस लावत आहेत. रझा अकादमीच्या (Raza Akadami) मोर्चात पोलीस भगिनींवर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) हा मोर्चा काढणारा एकमेव पक्ष होता. तेव्हा सगळे भाजपवाले (BJP) शेपट्या घालून बसले होते. तेव्हा मनसे रझा अकादमीवाल्यांना भिडली होती. त्यामुळे काठ्या चालवणऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये, असा टोला संदीप देशपांडे यांनी नितेश राणे आणि भाजप पक्षाला लगावला.
मीरारोडमध्ये अमराठी दुकानदाराला मनसेने मारहाण केल्याच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी जोरदार टीका केली होती. हिंदू धर्मियांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी मोहम्मद अली रोड आणि नळबाजारात जाऊन आपली ताकद दाखवावी. या परिसरातही मराठी भाषा ऐकायला येत नाही. तिकडचे दाढीवाले आणि गोल टोपीवाले मराठी बोलतात का? मनसे तिकडे जाऊन अशी हिंमत दाखवू शकेल का? आमिर खान आणि जावेद अख्तर यांनाही मराठी येत नाही, मग तिकडे कोणी कसं बोलत नाही? आमचं सरकार हिंदुत्त्ववादी विचारांचं आहे. त्यामुळे आमच्या हिंदू बांधावांना मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे नितेश राणे यांनी म्हटले होते.
Sandeep Deshpande: व्यापारी आहात, बाप बनायचा प्रयत्न करु नका; संदीप देशपांडेंचा इशारा
बेपारी आहात बेपार करा,आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका.महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल बाकी मेहता बिहता नी चड्डीत राहायचं. तूर्तास एवढंच, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी केले होते. काल भाजपच्या लोकांनी दोन तीन बेपारी लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांना मला सांगायचे आहे की मराठीच्या विरोधात जाल तर कानाखाली खाल, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
BJP & MNS: मीरा-भाईंदरमधील मराठी भाजप पदाधिकार्याचा राजीनामा
मीरा-भाईंदरमधील भाजपचे मराठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले होते. याच नाराजीतून पेंकरपाडा येथील भाजपचे प्रभाग अध्यक्ष श्री. कुंदन सुरेश मानकर यांनी भाजपला रामराम ठोकून मनसेत प्रवेश केला.
आणखी वाचा