Nitesh Rane & Aaditya Thackeray : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनच्या (Disha saliyan) मृत्यूमध्ये कोणताही गैरप्रकार नाही आणि ती आत्महत्या होती, असे पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितल्यानंतर शिवसेनेचे ( Shiv Sena UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना एकप्रकारे पोलिसांनी क्लीनचीटचं दिल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान यगुरुवारी भाष्य करण्यास नकार दिला.
दुसरीकडे याच मुद्द्यावरून भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणार्या आरोपासंदर्भाने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, नितेश राणेंनी (Nitesh Rane) नाक घासून माफी मागावी, असेही म्हटले होते. आता, नितेश राणेंनी याबाबत भूमिका व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नितेश राणेंनी याबाबत माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणे सभागृहाबाहेर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. तर, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्रीही केली. दरम्यान याच मुद्द्यावरून आता सोशल मीडियावरुही पाहायला मिळत आहे. नितेश राणेंनी केलेल्या आदित्य ठाकरेंच्या मिमिक्रीवर आता ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी बोचरी टीका करत नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.
असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर
उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा किकीक करणारा… असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण? अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणेंवर बोचरी टीका केली आहे.
नितेश राणेंकडून आदित्य ठाकरेंची मिमिक्री
पावसाळी अधिवेशनादरम्यान नितेश राणेंनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर, तिथून ते निघत असाताना नेमकं आमदार आदित्य ठाकरेही समोर आले होते. त्यामुळे, राणे-ठाकरे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला. लहान आवाजात.. ये चला.. चला... असं म्हणत नितेश राणेंनी मिमिक्री केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दिशा सेलियन प्रकरण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणात एसआयटी रिपोर्ट संदर्भात जे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल करण्यात आले, हे चुकीचे असून त्याच्या विरोधात आम्ही पुन्हा हायकोर्टात अपील केली आहे. हे प्रतिज्ञापत्र दाखल करणारे पोलीस निरीक्षक नगरकर यांच्या विरोधात देखील आम्ही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे, असे दिशाच्या वडिलांचे वकील एडवोकेट निलेश ओझा यांनी सांगितले आहे. आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यात देखील सीबीआयच्या रिपोर्टचा दाखला देण्यात आला होता, तो चुकीचा होता असे काल आम्ही हायकोर्टात सिद्ध केले. त्याचप्रमाणे येत्या 16 जूनला पुन्हा सुनावणी होईल, त्या दिवशी आम्ही काही व्हिडिओ आणि अत्यंत महत्त्वाचे पुरावे हे हायकोर्टात सादर करू, असेही एडवोकेट निलेश ओझा यांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या