Vaibhav Khedekar MNS: राज ठाकरेंचा कोकणातील कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला लागलाच? वैभव खेडेकर पक्षात नाराज
Vaibhav Khedekar: आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी है, असे सांगत रामदास कदम यांनी म्हटले होते.

Vaibhav Khedekar MNS: विधानसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी होऊनही सातत्याने चर्चेत राहण्यात यशस्वी ठरलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या नाराजीपोटी वैभव खेडेकर वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना जाहीरपणे पक्षात येण्याची ऑफर दिली होती. या कार्यक्रमातील वैभव खेडेकर यांची उपस्थितीत चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर लगेचच वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याची बातमी समोर आली आहे.
यापूर्वी पुण्यातील डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी मनसेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडला होता. त्यानंतर आता वैभव खेडेकर यांनीही त्याच पद्धतीचा आरोप करत राज ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना वेळ दिला जात नसल्याची खंत वैभव खेडेकर यांनी व्यक्त केली आहे.
वैभव खेडेकरांच्या नाराजीमुळे दापोली खेड मधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. खेडेकर यांचा व्हॉट्स अँप स्टेटस ठेवून सूचक इशारा दिला आहे. खेडेकर यांनी स्टेटस ठेवत म्हणाले 'जय महाराष्ट्र', असे म्हटले आहे. वैभव खेडेकर यांच्या नाराजी नाट्यामुळे मनसे समोर कोकणात आव्हान निर्माण होणार आहे.
Ratnagiri news: रत्नागिरीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
रत्नागिरीच्या चिंचघर येथील कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत (Uday Samant), मंत्री योगेश कदम ,माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर एकाच व्यासपीठावर होते. त्यावेळी रामदास कदम यांनी म्हटले की, वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो. वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे. आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी है, असे सांगत रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांना शिंदे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली. तर उदय सामंत यांनीही, आज जे व्यासपीठ तयार झालंय ते असेच राहावं, असे म्हणत वैभव खेडेकर यांना साद घातली होती.
आणखी वाचा
























