छत्रपती संभाजीनगर : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं होतं. संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले होतं. या वक्तव्यानंतर मविआसह महायुतीच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं होतं. तर दुसरीकडे याच मुद्यावरून भाजप खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर खोचक शब्दात टिप्पणी केली होती.
अशातच, राणे बापलेकांनी काल (2 जानेवारी) बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी घेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका बदलली असल्याचे पुढे आले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य असल्याचे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे अशक्य, कारण...
उबाठा गटाने आपली सर्व लाईन पूर्णपणे बदलली आहे. हिंदुत्व त्यांच्याकडे राहिलं नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा त्यांनी स्वीकारली आहे. त्यांना देशद्रोही लागत असून स्व. सावरकर त्यांना नको आहेत. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून ते बसले आहेत. त्यामुळे ते आता फार लांब निघून गेल्याने एकत्र येणं शक्य नसल्याची भूमिका आता संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घेतली आहे.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. जर भाजपने स्वबळाची तयारी केली तर तो त्यांचा विषय आहे. पण शिवसेनेची तयारी नाही असे काही नाही. आम्ही पण प्रत्येक वार्डमध्ये तयारी केली आहे. आमची पण तयारी आहे. तर शिवसेना पक्षप्रवेश संदर्भात एकनाथ शिंदे हे योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार आहेत. अनेक नेते ,कार्यकर्ते, खासदार संपर्कात आमच्या आहेत. असा दावा ही संजय शिरसाट यांनी केला आहे.
....त्यामुळे काही कंत्राटदारांचे पैसे थकले
माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील त्यावर खर्च झाला आहे. त्यामुळे काही कंत्राटदारांचे पैसे थकले आहे. पण काम बंद केले नाही. हा संकटाचा वाईट काळ आहे, पण योजना थांबवता येणार नाही. हा जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तर त्यात मुंबईकरांना काही तरी योग्य दिले जाईल. जर ठेवी कमी झाल्या असतील तर त्या विकासकामसाठी वापरल्या आहेत असेही संजय शिरसाट म्हणाले. तर पालकमंत्री संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकत्र बसून या संदर्भातला योग्य निर्णय घेतील. असेही ते म्हणाले.
त्यामुळे काही कंत्राटदारांचे पैसे थकले

हे ही वाचा