उद्या पत्रकार परिषदेत भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा करणार- अंजली दमानिया
आतापर्यंत आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या राख घोटाळा, काळे पैसे त्यांच्या खात्यात कसे आले, सरकारी कंपनीचा फायदा एका मंत्राला कसा झाला, हे दाखवलं. त्यांच्या जमिनी दाखवल्या. त्यांच्या आर्थिक व्यवहार दाखवला, त्यांच्या आणि वाल्मिकी कराड यांच्या जवळीक दाखवले. उद्या जे मी पत्रकार परिषद घेऊन पुरावा दाखवणार असून मंत्री असताना भ्रष्टाचाराचा खूप मोठा खुलासा असणार आहे. कसा यंत्रणांच्या गैरवापर केला जातो त्याच्या देखील खुलासा करणार आहे, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच हे पुरावे मी भगवानगडावर देणार आहे, आणि मागणी करणार आहे तुम्ही दिलेला त्यांना पाठिंबा काढून घ्या. दुसरी मागणी अशी असेल हे पुरावा मी जे दिले, हे तुम्हाला जर योग्य वाटत असेल, तर त्यांनी तरी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करायला हवी. असं जर झालं तर पूर्ण महाराष्ट्र भगवानगडाला नमन करेल, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही- अंजली दमानिया
नामदेव शास्त्री महाराज जर खरंच देशमुख कुटुंबीयांचा पाठीमागे असतील, तर त्यांनी त्या देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी जी विघ्न आहेत ती दूर करावी अशी विनंती आहे. त्यातला सर्वात मोठा विघ्न म्हणजे धनंजय मुंडे...धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहे, तोपर्यंत इथे न्याय होणार नाही. म्हणून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं काम आता भगवानगडानेच करायला हवं. त्यानंतरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल, असं अंजली दमानिया यांनी सांगितले.