Nawab Malik: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून मात्र ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जातय. दरम्यान, मलिक कुटुंबाच्या नावानं राज्यात अनेक ठिकाणी जमीन असल्याची भाजपकडून आरोप केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर नवाब मलिकांची उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळा येथे 150 एकर जमीन असल्याचा आरोप भाजप नेते नितीन काळे यांनी केलाय. तसेच ईडीनं या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केलीय. 


ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यावर जमीन घोटाळ्याचा भाजपने आरोप केला आहे. मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे 150 एकर जमीन आहे.  इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला याची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.


नवाब यांची पत्नी मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान, फराज नवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी 20 डिसेंबर 2013 रोजी केली आहे. जमीन् बागायती असताना जिरायती जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केलं. त्यामुळं सरकारचा महसूल बुडालाय. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखात जमीन खरेदी केल्याचं नमूद केलंय. मात्र, प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना जास्त रक्कम दिली असल्याचा आरोप भाजपने केलाय. या जमिनीवर शेततळे असून बागायत आहे. त्यात आलिशान बंगला असताना त्याचं मूल्यांकन खरेदी करताना दाखविले गेले नाही. त्यामुळे सरकारचा महसूल बुडालाय.


150 एकर जमीन खरेदी करताना नवाब कुटुंबाकडे इतका पैसा कुठून आला ? हा पैसा बेनामी असल्याचा भाजपचा केला आहे. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशीची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी केली आहे. मलिक कुटुंबाच्या नावाने राज्यात अनेक ठिकाणी असून आहे त्यासाठी पैसा कुठून आला हे चौकशी करण्याची भाजपाची मागणी आहे.


उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल 150 एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय ? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले व सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडावीला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली असे अनेक बाबी संशयस्पद असून इडीने याची चौकशी करावी अशी मागणी केली. मलिक यांची पत्नी मुलगी व मुलगा यांच्या नावाने ही जमीन असून 8 वर्षांपासून जमीन पडीक आहे.



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha