Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवरा यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश त्यांनी केला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jan 2024 04:12 PM
मुस्लिम समाजाचे मौलाना यांचाही शिंदेगटात 

 


मौलाना जियाउद्दीन शेख
मौलाना नौशाद खान
मौलाना झुबेर खान 
मौलाना झिशान खान 
मौलाना नासिर खान 
मौलाना इरफान खान 
मौलाना रहमान कासिम

मिलींद देवरांसह आज वर्षावर शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला

सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष 


प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक


सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक


रामवचन मुराई , माजी नगरसेवक


हंसा मारु, माजी नगरसेवक 


अनिता यादव, माजी नगरसेविका
रमेश यादव


गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक


प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई काॅग्रेस 


सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष 


पुनम कनोजिया 


संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष 


दिलीप साकेरिया - मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष 


हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी 


राजाराम देशमुख, सचिव- मुंबई काॅग्रेस - विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर


त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई काॅग्रेस कमिटी 


कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष


८५ वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश

Milind Deora : आज काँग्रेससोबत नातं तोडतोय - मिलिंद देवरा 

मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज माझ्या कुटुंबाचं काँग्रेससोबतचं 55 वर्षांचं नातं मी तोडतोय

Milind Deora : काँग्रेससोबतचं नातं का तोडलं, मलिंद देवरा यांचे स्पष्टीकरण 

मी काँग्रेससोबतचं नातं का तोडलं?


- मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत 


- माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची  काँग्रेस  यात खूप फरक झाला. 


जर काँग्रेस आणि उबाठा यांनी सकारात्मक, मेरीट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं

Milind Deora : मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश

Milind Deora : मिलिंद देवरा यांचा शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश

Milind Deora Quits Congress LIVE Updates : काँग्रेसमधून आज शिंदे गटात प्रवेश करणारे मुंबईचे माजी नगरसेवक

Milind Deora Quits Congress LIVE Updates : काँग्रेसमधून आज शिंदे गटात प्रवेश करणारे मुंबईचे माजी नगरसेवक



  • सुनिल नरसाळे 

  • राजेंद्र नरवणकर

  • हंसा मारु

  • रामवचन मुराई

  • प्रमोद मांद्रेकर

  • अनिता यादव

  • गजेंद्र लष्करी

Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी वर्षावर दाखल

Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी वर्षावर दाखल

Milind Deora Quits Congress LIVE Updates : सध्याची दक्षिण मुंबईतील राजकीय परिस्थिती काय? 

Milind Deora Quits Congress LIVE Updates : 2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली. त्यावेळी शिवसेना मात्र एकसंध होती आणि शिवसेना-भाजपा युती होती. मात्र, आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 


दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गटाचे आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गटाचे आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गटाच्या आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे. त्यात आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे मिलिंद देवरांनी जर शिंदे गटात प्रवेश केला, तर ते त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल, असं दिसतंय. 

Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरा कोण? 

Milind Deora Quits Congress LIVE Updates : काँग्रेस नेते मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसमधील एक मोठं नाव. काँग्रेसमधील प्रबळ नेते आणि दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख. ठाकरेंकडून दक्षिण मुंबई मतदारसंघावर वारंवार दावा सांगण्यात आला आणि दुसरीकडे मिलिंद देवरांच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या. आता याच नाराजीतून मिलिंद देवरा मोठं पाऊल उचलण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद देवरांच्या पक्ष बदलामुळे निश्चित काँग्रेसचं मोठ नुकसान होईल. पण दक्षिण मुंबईतील सगळीच राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. 


मिलिंद देवरा 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य म्हणून मिलिंद देवरांना ओळखलं जायचं. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं विजय मिळवला. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले. मिलिंद देवरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1976 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे प्रबळ नेते मुरली देवरा. 

CM Eknath Shinde : मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया

CM Eknath Shinde on Milind Deora : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मिलिंद देवरा यांच्या पक्षप्रवेशाबाबत यांनी म्हटलं आहे की, मी याबद्दल ऐकलं आहे, अद्याप मला माहिती नाही. त्यांचा पक्षप्रवेश होत असेल, तर त्यांचा स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

Milind Deora Quits Congress LIVE Updates : काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हते, म्हणून देवरांचा राजीनामा, अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया

Atul Londhe On Deora : ज्याला काँग्रेसमध्ये तिकीट मिळणार नव्हते, जो दोन वेळा पराभूत  झालेला उमेदवार होता, ज्याच्या विरोधात सर्व्हे आला होता, याची कल्पना आल्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट केला असेल, असे मत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केलं आहे. अजून काही पराभूत उमेदवार त्यांच्यासोबत जाताना दिसतील, असंही लोंढे म्हणाले आहेत. एकनाथ शिंदेसोबत जनता बिलकुलच नाही, संविधानाची उपेक्षा करून नार्वेकरांनी निकाल दिला आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी याला घाबरून लोक जात आहे. याकरता राहुल गांधींना दोष देण्यात काही अर्थ नाही असे लोंढे म्हणाले.

Milind Deora Quits Congress LIVE Updates : मिलिंद देवरांचं स्वागत, आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ : चित्रा वाघ

Chita Wagh on Milind Deora LIVE Updates : जे अमच्याकडे येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाऊ. असा मोठा कारवा आहे. पुढे हा कारवा मोठा होत जाईल. पुढेही अनेक नेते महायुतीकडे येतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सारख्यांचा नेतृत्व आमच्याकडे आहे. तिघांच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक नंबरवर जात आहे. म्हणून बरीच लोक आमच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Milind Deora on Resignation From Congress LIVE: मी विकासाच्या वाटेवर आहे; राजीनाम्यानंतर मिलिंद देवरांची पहिली प्रतिक्रिया

Milind Deora on Resignation From Congress LIVE: महाराष्ट्र (Maharashtra Politics) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी पक्ष सोडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. आता विकासाच्या वाटेवर निघाल्याचे ते म्हणाले.

Balasaheb Thorat on Milind Deora LIVE: मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat on Milind Deora Resigns LIVE Updates: मिलिंद देवरांच्या राजीनाम्यावर बाळासाहेब थोरात यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट केलंय की, "आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत, पीडित जनतेला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी 6 हजार 700 किलोमीटरची यात्रा काढणाऱ्या राहुलजी गांधी यांच्या मार्गात अडथळे आणण्याचा आपला हा प्रयत्न आपले वडील, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते स्वर्गीय मुरली देवरा यांना ही आवडला नसेल."

Nana Patole on Milind Deora Resigns: राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप, त्यांचे सहकारी पक्ष घाबरले : नाना पटोले

Nana Patole on Milind Deora Resigns LIVE: आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहका-यांना आपल्यासोबत घेत आहेत. 


काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायेत पण तो यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्ती सोबतच असंवैधानिक भाजप, शिंदे, अजित पवार सरकारचाही शेवटही होणार आहे.

Milind Deora Resigns LIVE: मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार, 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार

Milind Deora Resigns From Congress LIVE : मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Milind Deora Resigns: ठाकरेंच्या दक्षिण मुंबईवरील दाव्यामुळे मिलिंद देवरा नाराज? काँग्रेसची साथ सोडणार 

Milind Deora Resigns From Congress LIVE Updates: भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत, पण तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरतंय ते लोकसभेचं जागावाटप. मुंबईतील मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जात आहे. याच दाव्यांवरुन आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपला दावा सांगितला. तेव्हापासूनच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे नाराजीचे सूर उमटू लागले. अशातच आता हेच मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा भाजप आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची माहिती मिळत आहे. 


काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं की, दक्षिण मुंबईवर आमचा (ठाकरे गटाचा) दावा आहे आणि तिकडे उमेदवार देखील आमचाच असणार आहे, मिलिंद देवरांच्या नाराजीसाठी हेच कारण ठरलं अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता आपण जर लक्षात घेतलं तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तीन पक्ष एकत्र आहेत. अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही, अशातच संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मिलिंद देवरा यांनी दुसरी वाट निवडल्याचं बोललं जात आहे.

दक्षिण मुंबईची जागा आमचीच, मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा पुर्नरुच्चार

Milind deora resigns from congress LIVE Updates: दक्षिण मुंबईची जागा आमचीच असल्याचा पुर्नरुच्चार शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार (Shiv Sena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मिलिंद देवरांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांच्या या वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपला दावा सांगितला. तेव्हापासूनच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे नाराजीचे सूर उमटू लागले. अशातच आता हेच मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा भाजप आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची माहिती मिळत आहे. 

Milind Deora Resigns LIVE: पक्षासोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय; मिलिंद देवरा यांचं ट्वीट

Milind Deora Resigns LIVE Updates: मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे." मिलिंद देवरा यांच्या ट्वीटवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


मिलिंद देवरा यांचं ट्वीट 



Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवराजी, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी : वर्षा गायकवाड


Varsha Gaikwad on Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं आहे. "मिलिंद देवराजी, तुम्ही घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मला खूप दुःख होतंय. आम्ही अनेक दिवस तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पक्षश्रेष्ठींनीही तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, भारत जोडो न्याय यात्रा ज्यादिवशी सुरू होते आहे, त्याच दिवशी  हा निर्णय घेतला हे ही दुर्दैवी आहे.", असं ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. 




 

Milind Deora Resigns LIVE: दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न : नाना पटोले 

Nana Patole On Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आजपासून सुरु होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ED, CBI, IT यासारख्या केंद्रीय संस्थांची भिती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्यासोबत घेत आहेत. दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन न्याय यात्रेच्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न  केला जातोय."

Milind Deora Resigns LIVE: मिलिंद देवरा यांचं नाव न घेता, जयराम रमेश यांच्याकडून मुरली देवरांच्या आठवणींना उजाळा 

Jairam Ramesh on Milind Deora Resigns LIVE Updates: काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरा यांचं नाव न घेता, मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, "मुरली देवरा यांच्यासोबतचे ते दिवस मला आठवतायत. सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे जीवलग मित्र होते, पण ते काँग्रेसशी एकनिष्ठ होते. ते प्रत्येक कठिण काळात, अडचणींच्या वेळी काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले. तथास्तु!" 

Milind Deora Resigns: तथास्तु! मिलिंद देवरांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; जयराम रमेश यांची अनुल्लेखानं टीका

Jairam Ramesh on Milind Deora Resigns: मुंबई : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला आजपासून काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरुवात होत आहे. अशातच मुंबईत (Mumbai Politics) मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. माजी खासदार आणि पक्षाचे वरच्या फळीतील प्रबळ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Group) जाहीर प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आज संपत आहे, असं म्हणत मिलिंद देवरा यांनी ट्वीट करत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 


सविस्त वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Milind Deora Tweet : पक्षासोबतचं 55 वर्षांचं नातं संपवतोय; मिलिंद देवरा यांचं ट्वीट 

Milind Deora Tweet : मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट होत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. माझ्या कुटुंबाचं पक्षाशी असलेलं 55 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचा वर्षानुवर्ष अखंड पाठिंबा दिल्याबद्दल आभारी आहे." मिलिंद देवरा यांच्या ट्वीटवर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मिलिंद देवरांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Milind Deora Resigns: काँग्रेस नेते मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम; शिंदे गटात प्रवेश करणार

Milind Deora Resigns: काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस  सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश होणार आहे.. तसंच  सकाळी 11 वाजता सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मिलींद देवरा आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील.


दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश करत आहेत. 

पार्श्वभूमी

Milind Deora Resigns LIVE Updates: काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस  सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मिलिंद देवरा 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह आज शिंदे गटात प्रवेश केला. दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेश करण्यात आला.


दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत  प्रवेश केला. 


दक्षिण मुंबईतील सध्याची राजकीय परिस्थिती काय? 


2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली. त्यावेळी शिवसेना मात्र एकसंध होती आणि शिवसेना-भाजपा युती होती. मात्र, आता शिवसेनेतील प्रबळ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 


दक्षिण मुंबईत एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वरळीतून आदित्य ठाकरे (ठाकरे गटाचे आमदार), शिवडी अजय चौधरी (ठाकरे गटाचे आमदार), भायखळा यामिनी जाधव (शिंदे गटाच्या आमदार), मलबार हिल मंगल प्रभात लोढा (भाजप आमदार), कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप आमदार) आणि मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस आमदार) असं बलाबल सध्या दक्षिण मुंबईत आहे. त्यात आता शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल, असं दिसतंय. 


दक्षिण मुंबई मतदारसंघात मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहे. अशातच दक्षिण मुंबई लोकसभेसाठी मिलिंद देवरा एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा ठरतील, हे मात्र नक्की. अशातच देवरांसाठी एक अडचणी मात्र नक्की असेल, ती म्हणजे, लालबाग, काळाचौकी, शिवडी आणि परळ भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मिलिंद देवरांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील हा भलामोठा मराठी पट्टा कितपत स्विकारेल हा मोठा प्रश्नच आहे. लालबाग, परळ म्हणजे, एकंदरीत संपूर्ण गिरणगाव गेल्या कित्येत वर्षांपासून शिवसेना आणि विशेषतः ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे या पट्ट्यात देवरांना कितपत पसंती मिळेल हा प्रश्नच आहे. अशातच इथे मनसेनं उमेदवार दिला, तर मात्र समीकरण काहीसं बदलू शकतं, एवढं मात्र नक्की. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.