नाशिक : 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते. आता 1500 वर आलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येत नाही. आमचे सरकार येणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) पैसे वाढवून देणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आताच रक्कम वाढवून द्या, असे आव्हान युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) दिले आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या येवला विधानसभा मतदारसंघातील (Yeola Vidhan Sabha Constituency) जाहीर सभेत ते बोलत होते. 


आदित्य ठाकरे म्हणाले की, येथे जे मंत्री आहेत त्यांना कधी वाटले नाही का? जनतेला पाणी मिळावे. येथे अजूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खोके सरकार आपल्यावर बसवले आहे. मात्र, पुढचे सरकार आपण निवडणार आहोत. लोकसभेची मोठी लढाई आपण जिंकलो आहोत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांची मागणी छोटी आहे. दोन्ही परीक्षा एकाच वेळी हा हट्ट का? मागील वर्षीही तेच झाले होते. सत्ताधारी पक्ष, मंत्री या विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत,  असे त्यांनी म्हटले. 


आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखविले


ते पुढे म्हणाले की, तुमच्या पुढील पिढीने शेती करू नये, असे आपल्याला का वाटते? मागील दोन वर्षात एक तरी उद्योग राज्यात आला आहे का? स्पर्धा परीक्षांचा घोळ घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. एका उपमुख्यमंत्र्‍यांकडे गेले की दुसरा नाराज होतो, खोके घेतले जातात. खासगी, सरकारी एक तरी नवी नोकरी मिळाली आहे का? उद्धव ठाकरे यांच्या काळात कोरोना असतानादेखील राज्यात गुंतवणूक आली. आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखविले. फडणवीस यांनी कर्जमुक्ती आणली. पण, अटी शर्थी जास्त लावल्या, होर्डिंग्ज लावले. उद्धव ठाकरेंनी निवडणूक नसताना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती करून दाखविली. कोरोना काळात सर्व बंद होते तरीही शेतकऱ्यांना मदत देत होतो. 


लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार 


आता गुजरातमधील कांदा निर्यातबंदी आधी उठवली आणि नंतर महाराष्ट्रमधली उठवली, हा दुजाभाव का ऑलिम्पिकमध्ये गुजरातमधील खेळाडूंना जास्त पैसे आणि इतर राज्यातील खेळाडूंना कमी पैसे दिले. 2014 मध्ये सर्वांच्या खात्यात 15 लाख देणार होते. आता 1500 वर आलेत. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे सरकार पुन्हा येत नाही. आमचे सरकार येणार आहे. आम्ही लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर आताच रक्कम वाढवून द्या, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. 


तोपर्यंत आपली लढाई थांबणार नाही


बदलापूरची शाळा भाजपच्या पदाधिकाऱ्याची आहे. एफआयआर घ्यायला एवढा उशिर का झाला? असे सरकार तुमचा लाडका भाऊ असू शकतो का? दोन वर्षांपूर्वी जे निर्लज्ज सरकार सत्तेत आले त्यांना बाजूला करा. घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की, फाशीची शिक्षा आम्ही गुन्हेगारांना दिली. मी त्यांना विचारतो ही घटना कधी घडली, कोणासमोर घडली, फाशीची शिक्षा कधी दिली हे सांगा. गर्भवती महिलेला 10 तास पोलीस ठाण्यात बसवले. भाजप आणि मिंधे सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करत नाही तोपर्यंत आपली लढाई थांबणार नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.  


आणखी वाचा 


Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल