Eknath Shinde : 2 महिन्यात फाशी दिल्याच्या दाव्याने वाद, मुख्यमंत्र्यांनी तो खटला स्वत: सांगितला!
Eknath Shinde, कोल्हापूर : बदलापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, हे प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील एका घटना फास्टट्रॅक चालवून आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, असा दावा केला.
मात्र, हे प्रकरण निकाली लावण्यासाठी 1 वर्ष 7 महिने लागले होते.
मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात असेच एक प्रकरण घडले होते.
2 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आले होती.
त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी मृतदेह सापडला.
कामशेत पोलिसांकडून आरोपीसह त्याच्या आईला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. जलदगीत न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले.
खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि उलटतपासणी करण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.