एक्स्प्लोर

Loksabha Election: मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?

maratha Aarakshan: मनोज जरांगे पाटील बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा असताना आणखी एका मराठा नेत्याने थेट छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता.

छत्रपती संभाजीनगर: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असणारे मराठा नेते विनोद पाटील हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विनोद पाटील (Viond Patil) यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपण छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या पक्षाकडून मला छ. संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी, अशी इच्छाही बोलून दाखवली. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली असताना विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, आतापर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई लढलो. पण समाजव्यवस्थेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी सभागृहात जाणे गरजेचे आहे. अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. आता मी सभागृहात गेले पाहिजे. तरुण, शेतकरी, महिला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला तर त्याला अधिक बळकटी मिळेल, असे सर्वांचे म्हणणे आहे. त्यासाठी या सगळ्यांनी माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. हा आग्रह मान्य करुन मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे आणि विनोद पाटलांची उमेदवारीबाबत चर्चा

यावेळी विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या तिकीटावर छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी राजकीय चर्चा झाली होती. या चर्चेवेळी त्याठिकाणी अनेकजण हजर होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला विचारले होते की, तुझ्या निवडणुकीचं काय? तेव्हा मी म्हटलं होतं, आता तरी मला निवडणूक लढवण्यात काही रस नाही. पण मराठा आरक्षण मिळाल्यावर मी लोकसभा लढवेन, असे मी त्यांना म्हणालो होतो. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून संभाजीनगरमध्ये हिंदू समाज धनुष्यबाणाला मतदान करत आला आहे. हिंदू समाजाला धनुष्यबाणाशिवाय मतदान करण्यासाठी दुसरं चिन्हंच उपलब्ध नव्हते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही छ. संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदे यांना सुटेल. त्यांना ही जागा सुटली तर एकनाथ शिंदे येथून लढण्यासाठी मला आशीर्वाद देतील. ते मला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी देतील, अशी आशा असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. 

आणखी वाचा

मनोज जरांगे बीड लोकसभा मतदारसंघातून 'मविआ'चे उमेदवार असणार; भाजप नेत्याचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget