Jammu and Kashmir: काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीमध्ये पक्षाला गळती लागली आहे. रविवारी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या समर्थनार्थ माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ताज मोहिउद्दीन यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचा राजीनामा देणारे ते काँग्रेसचे दहावे माजी आमदार आहेत. मोहिउद्दीन हे देखील गुलाम नबी आझाद यांच्या नव्या पक्षात सामील होणार आहेत. ते म्हणतात की "नवीन पक्ष कधीही भाजपशी युती करणार नाही, परंतु एनसी किंवा पीडीपीशी हातमिळवणी करू शकतो. ज्या दिवशी मला वाटेल की माझा नवा पक्ष भाजपशी जुळवून घेत आहे. तेव्हा मी हा पक्षी सोडेन."


ताज मोहिउद्दीन म्हणाले, "आझाद भाजपसोबत जाणार असल्याचा अफवा पूर्णपणे निराधार आहेत. आमचा भाजपशी काहीही संबंध नाही. आमची धर्मनिरपेक्ष परंपरा आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही गैर पक्षाशीहातमिळवणी करणार नाही.'' आपल्या पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी यांच्या विधानावर ताज म्हणाले की, कलम 370 रद्द करण्यासाठी तेच जबाबदार आहेत. या मुद्द्यावर आझाद यांची संसदेत सुमारे दोन तास बोलत होते.


ताज मोहिउद्दीन (Taj Mohi-ud-din) पुढे म्हणाले, "आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने संसदेत कलम 370 रद्द करण्याबाबत बोलण्याची हिंमत केली नाही. कारण इतर सर्व नेत्यांना कलम 370 विरुद्ध काहीही बोलल्यास हिंदूंच्या प्रतिक्रियेची भीती वाटत होती. मात्र आझाद संसदेत कलम 370 च्या प्रत्येक पॅरामीटरबद्दल बोललो." ते म्हणाले की, "गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर अल्ताफ बुखारी अस्वस्थ का झाले. कारण त्यांना माहित आहे की, जे काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत ते पक्ष सोडून गुलाम नबी आझाद यांच्या पक्षात सामील होतील."


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर 


दरम्यान, आज काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक ऑनलाइन झाली. रविवारी दुपारी 3.30 वाजता सोनिया गांधी  (Sonia Gandhi) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबरपासून नामनिर्देशन सुरू होईल. 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर होतील.