Manoj Jarange: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. अनेक दिवसांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे करताहेत. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर बैठक 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते. पण याचसंदर्भात त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे मनोज जरांगे म्हणालेत. सरकारने दोन दिवसात डाव टाकला असून त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते. त्यामुळे अजून 4 महिने जायचे आहेत, त्यांना डाव खेळायला वेळ आहे. आपली रणनिती सुरु असून 29ला आपण काय भूमिका घेतो हे त्यांना पहायचे आहे. असेही जरांगे म्हणाले.
आपले डाव सरकारला का कळू द्यायचे?
विधानसभा निवडणूका दिवळीनंतर होतील असं सांगण्यात येत असताना त्यांनी निवडणूका डिसेंबरमध्ये ढकलल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागू शकते, अजून 4 महिने जायचे आहेत,त्यांना डाव खेळायला मोठा वेळ आहे. त्यांनी निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल असे जरांगे म्हणाले. यावेळेस जे होईल ते होईल, आपली रणनिती, डाव-प्रतिडाव सरकारला कळू द्यायचे? असं जरांगे म्हणाले. जेंव्हा निवडणूकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं ते म्हणाले.
दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचं की नाही
२९ ऑगस्ट रोजी बैठक होणार नाही असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले असून दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचं की कसं, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, प्रत्येक गावाने ज्या नोंदी सापडलया आहेत, ज्यांना सापडल्या नाहीत त्यांनी तहसिलदारांकडे जाऊन जाब विचारावा. सरकारवर आता बेकार वेळ आली आहे. आता बैठक होणार नसली तरी आपण मतदारसंघनिहाय घोंगड्या बैठक घेऊ, या बैठकीला मी येतो असे जरांगे म्हणाले. दीड दोन महिन्यांनी ठरवू लढायचे की कसे असेही ते म्हणाले.
इच्छूकांच्या अर्जाची छाननी करू
सरकारने विधानसभा निवडणूका पुढे ढककल्या आहेत. आता राष्ट्रपती राजवट लागली तर प्रशासक म्हणून तेच बसणार आहेत.तयामुळे इच्छूक उमेदवार त्यांच्यांकडे गेले म्हणून त्यांना बहुतेक आंदोलन रणनिती उघडी करायची होती. म्हणून त्यांनी डाव टाकल्याचे जरांगे म्हणाले. आताच आपली रणनिती सांगायला नको अशी भूमिका त्यांनी घेतली. सर्व इच्छूकांच्या अर्जाची आपण छाननी करू, सर्व इच्छूक उमेदवारांनी २४ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज घेऊन यावेत. असेही जरांगे म्हणाले.
हेही वाचा: