Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आक्रमक झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची गंभीर टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा कार्यकर्ते जरांगे पाटलांच समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषण स्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण करुन मरण्यापेक्षा फडणवीसांच्या दारात जातो, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.


मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने


मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली, त्यामुळे येथे प्रचंड गदारोळ पाहायला मिळत आहे.


'मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो' 


मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, निघालो मी असं म्हणत जरांगेंनी मुंबईची वाट धरली आहे. उपोषणामुळे जरांगेची प्रकृती खालावली आहे. अशक्तपणामुळे त्यांना नीट चालताही येत नाही. पण, तरीही जरांगे मुंबईला सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम आहेत. गावकरी आणि मराठा कार्यकर्ते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.


जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम


मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा आणि मुंबईकडे जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं असलं तरी, जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहेत. गेल्या काही दिवसांत मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही पत्रकार परिषद घेण्यात आल्या, ज्यामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले, यानंतर जरांगे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार विशेषत: फडणवीसांचे हे षडयंत्र असून आपली बदनामी करण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे.


पंधरा दिवसांपासून जरांगेचं उपोषण


गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. त्याआधी गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी जरांगेचा लढा सुरु आहे. सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे ठाम असून त्यासाठी त्यांनी उपोषण सुरु केलं. मात्र, सरकारने यावेळी जरांगेशी चर्चा न करता विशेष अधिवेशन बोलावत मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिलं. पण, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि सगे सोयरे अध्यादेश लागू करावा, यासाठी जरांगेचं उपोषण सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maratha Reservation : सलाईनमधून विष देण्याचा, माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव; मनोज जरांगे पाटलांचे गंभीर आरोप