Deepak Kesarkar on Narayan Rane : कोकणातील मोठ्या नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख आहे असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री (Cabinet Minister for Ministry of Education and Ministry) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणेंबाबत (Narayan Rane) केलं आहे. नारायण राणेंसारखा फायटर नेता एकदा जरी खासदार झाला तर, खूप कायापालट करू शकतात. मात्र, विनायक राऊत यांना दोन वेळा खासदार करून काही उपयोग नाही, असं म्हणत केसरकरांनी विनायक राऊतांवर निशाणा साधला आहे. कोकणातील फायटर नेत्याचा पराभव केला याचं आजही दुःख असून नारायण राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.


नारायण राणेचा पराभव केल्याचं आजही दुःख


विनायक राऊत यांना लोकसभेत निवडून आणण्यासाठी मदत केली आणि नारायण राणेंसारख्या कोकणातल्या एका मोठ्या नेत्याला पराभूत केलं, याचं आज सुद्धा दु:ख आहे. त्याची भरपाई म्हणून राणेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला तर मला आनंद होईल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. 


विनायक राऊतांचा केसरकरांवर पलटवार


दरम्यान, विनायक राऊतांनी दीपक केसरकरांवर पलटवार केला आहे. ''दीपक केसरकर हे सत्तेसाठी लाचार झाले असल्याने नारायण राणे यांचे पाय चाटू लागले आहेत. एक वेळ अशी होती की, हेच केसरकर राणेंच्या दहशतवाद आणि दादागिरीची आरोळी ठोकत फिरत होते. हेच केसरकर आता राणेंचे पाय धुवत आहेत, अशी बोचरी टीका खासदार विनायक राऊत यांनी केसरकर यांच्यावर केली आहे. राणेंसारख्या बड्या नेत्याचा पराभव केल्याचं दुःख मला होतंय, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होत यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत बोलत होते.


राहुल नार्वेकरांना खोचक टोला


संविधानाचा चोळा मोळा करणाऱ्या राहुल नार्वेकर यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी मिळत असेल तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. संविधानाचा चोळामोळा करणाऱ्यांना लोकशाहीच्या मार्गाने पराभव कसा असतो ते तिथल्या मतदारांना या निमित्ताने दाखवता येईल, असा खोचक टोला खासदार विनायक राऊत यांनी मारलाय. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल नार्वेकर यांच्या नावावर भाजपने लोकसभेसाठी शिक्कामोर्तब केलंय यावर ते बोलत होते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Deepak Kesarkar : शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांनी न केलेल्या कामांचा बॅनर, दिपक केसरकरांचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल