Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे हिंदीत बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाची माहिती देताना "डांबरी से पायी पायी जायेंगे," असं मनोज जरांगे म्हणाले होते. त्यानंतर मी हिंदी शिकणार असंही जरांगेंनी सांगितलं होतं. मात्र, आता मनोज जरांगेंनी आणखी एक किस्सा सांगितलाय. "एक जण मला हिंदी शिकवण्यासाठी आला होता. मात्र मला शिकवण्याच्या नादामध्ये तोही हिंदी विसरून गेले", असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते. 


तुम्ही मराठ्यांच्या मुलांवरती का घाव घालत आहात? मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तुम्ही थांबवल्या


मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही मराठ्यांच्या मुलांवरती का घाव घालत आहात? मराठ्यांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तुम्ही थांबवल्या. कुणबी पत्राचा ऑप्शन कोणालाही दिला नाही. तुम्ही मराठ्यांना किती दिवस फसवणार आहात. तुम्ही प्रत्येकवेळी मराठ्यांच्या पोरांना ऍडमिशनमधून बाहेर काढत आहेत. EWS अस्तित्वात असताना फॉर्म भरला मग त्यांना आता त्याचा लाभ का मिळत नाही? फडणवीस साहेब EWS हेच मराठ्यांच्या फायद्याचं होतं ते तुम्हाला दाखवायचं म्हणून एसीबीसीमधून फॉर्म भरलेले मुलं सुद्धा बाहेर काढत आहात.


लाडकी बहीण योजना आणली पैसे घेत चला हे आपलेच पैसे आहेत


आता मराठा तुमच्या पाठीशी उभा रहात नाही. आता लाडकी बहीण योजना आणली पैसे घेत चला हे आपलेच पैसे आहेत.  लाडक्या बहिणीला दीड हजार देता आणि त्या बहिणीच्या मुलाला म्हणजे तुमच्या भाच्याला शिक्षणात मिळत नाही त्याला आरक्षण का देत नाहीत? या मामांकडे मी सगळे भाचे घेऊन मुंबईला येणार आहे. तुम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा.  ह्या योजना आपल्या आयुष्याला पुरणार नाहीत. आता आणखी त्या वेगळ्या योजना आहेत, असंही जरांगेंनी नमूद केलं. 


फडणवीस साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका तुम्हाला महागात पडेल. मराठा सगळी भाजपा संपवतील. आणखी आम्ही आमच्या औकातीवर उतरलो नाहीत. मी यांना कायम शांत रहा असं सांगतोय. एकदा हे बिघडले तर तुम्हाला महाराष्ट्रात सभा घ्यायला सुद्धा मुश्किल होईल. आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीत. तुम्ही आमची कदर करत नाहीत.मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका, असंही जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Ladki Bahin Yojna: आम्ही लाडक्या बहि‍णींना 2000 रुपये देणार; सांगलीत राहुल गांधींसमोरच खर्गेंची मोठी घोषणा