Manoj Jarange: मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारनं दोन मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा डाव रचल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी केलाय.दोन मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत आंदोलनाबाबत दोन मंत्र्यांनी चर्चा केल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला. धाराशिव येथे शिवजयंती उत्सवासाठी आल्यानंतर नव्या मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी माध्यमांना मराठा आरक्षणावरून दोन मंत्र्यांना घेऊन सरकार नवंच मराठा आंदोलन उभं करणार असल्याचा प्लॅनच मनोज जरांगेंनी सांगितला आहे. (Manoj Jarange)मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपूर्वीच आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची त्यांची मागणी आहे. 


काय म्हणाले मनोज जरांगे?


आता जे गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समोर मराठा आरक्षणावरून सरकार नवं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.आम्ही म्हणू तसे ऐका, अन्यथा षडयंत्र रचून बदनाम करू अशी सरकाची भूमिका आहे. मराठ्यांच्या आंदोलनासमोर प्रति आंदोलन सरकार उभं करणार आहे. दोन मंत्री आहेत या आंदोलनात. दोन मंत्री पाठपुरावा करणार. 12-13 दिवस आमरण उपोषण करणार. या आंदोलनानंतर सरकारच बैठक लावणार आहेत. या सगळ्या आंदोलनाला देवेंद्र फडणवीसांची साथ आहे. हे त्यातल्या एका मंत्र्यानंच मला सांगितलं. असा दावा मनोज जरांगेंनी केला.


दरम्यान, 22 फेब्रुवारी ते 22 मार्च आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आपण एक आलो तर राहिलेले आरक्षण पण मिळेल असे मनोज जरांगे म्हणाले होते. नुसती गर्दी आणि मोठ्या सभेतून आपल्या समस्या सुटणार नाहीत. गावात येणारी अडचण सांगायला हक्काचं ठिकाण आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात एक सेवक द्यावा लागणार आहे. त्याला संपूर्ण गाव अडचणी सांगेल असे जरांगे पाटील म्हणाले. त्यासाठी एक महिना आपण ते काम करत आहोत. असं जरांगे म्हणाले होते. दरम्यान आज धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जरांगे पाटील हजेरी लावणार आहेत. धाराशिवमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दुचाकी रॅली ही निघणार आहे. 


 



हेही वाचा:


Manoj Jarange: 'साेलापुरकर मुख्यमंत्र्यांच्या टोळीतला, सरकारच्या आशीर्वादानेच..' मनोज जरांगेंची सरकारवर कडाडून टीका, म्हणाले..