Dharashiv: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून मराठी अभिनेता राहुल सोलापूरकवर (Rahul Solapurkar) कारवाई करावी यासाठी राज्यभरातून मागणी होत असताना  सोलापूरकरांच्या वक्तव्यामध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठली आहे. यावरूनच मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) कडाडून टीका केली.


'सोलापूरकरवर कारवाई कशी होईल.. मुख्यमंत्र्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला माणूस आहे. ही मुख्यमंत्र्यांची टोळी आहे. या टोळीत वकील आहेत. मोघम अभ्यासक आहेत जे साहित्यिक म्हणून नाव लावतात. सरकारच्या आशीर्वादाने राहुल सोलापूरकर वर कारवाई झालेली नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. हे तिरस्काराने भरलेले सरकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. धाराशिव जिल्ह्यात आज शिवजयंती उत्सवानिमित्त मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी छावा चित्रपट टॅक्स फ्री करावा ही मागणी मनोज जरांगे यांनी केली. द्वेषाने भरलेली टोळी असल्याची टीकाही त्यांनी केली. आज धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जरांगे पाटील हजेरी लावणार आहेत. धाराशिवमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत भव्य दुचाकी रॅली ही निघणार आहे. 


काय म्हणाले मनोज जरांगे?


राज्यातील आणि देशातील सगळ्या जनतेला छत्रपती शिवरायांच्याच्या खुप खुप शुभेच्छा देतो. आज चांगला दिवस आहे नासक्या मंत्र्याचं नाव घ्यायचं नको.. असे जरांगे म्हणाले .छावा चित्रपट टॅक्स फ्री करायला हवा .पण हा तिरस्कारचा भाग आहे .आरक्षणाचा असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा भाग असो .तिरस्काराने भरलेले सरकार आहे .काय करेल सांगता येत नाही .संतोष देशमुख यांचा प्रकरण असेल ,सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण ,महादेव मुंडेंचं प्रकरण ..अनेक जणांचे मर्डर झालेत .राहुल सोलापूरकर वर कारवाई होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसन वर पुन्हा एकदा टीका केली .पुणे पोलीस आयुक्तांनी सोलापूरकर यांच्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला माणूस आहे त्याच्यावर कारवाई होणारच नाही .मुख्यमंत्र्यांनी बनवलेली एक टोळी आहे .या टोळीत वकील आहेत. मोघम अभ्यासक आहेत जे साहित्यिक म्हणून नाव लावतात. सरकारच्या आशीर्वादाने राहुल सोलापूरकर वर कारवाई झालेली नाही .असेही मनोज जरांगे म्हणाले .


 



हेही वाचा:


Devendra Fadnavis: मंत्रिमंडळ बैठकीची गोपनीय माहिती बाहेर फोडल्यास कारवाई होणार, देवेंद्र फडणवीसांचा 'फितुरांना' निर्वाणीचा इशारा