Mahendra Dalvi, Raigad : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीकडून आणि खासकरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी निवडणूक लढली. मात्र, जयंत पाटील यांना अवघ्या बारा मतांवर समाधान मानावे लागले. जयंत पाटील यांचा पराभव झाला. मात्र त्याचा सर्वात जास्त आनंद अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांना झालाय.  महेंद्र दळवी (Mahendra Dalvi)  यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जल्लोष केलाय. 


"महेंद्र दळवी अंगार है बाकी सब भंगार है"


जयंत पाटील यांच्या पराभवानंतर महेंद्र दळवींनी अलिबाग मधील त्यांच्या फार्म हाऊसवर स्विमिंगचा आनंद घेतला. शिवाय ते चिखलात लोळलेले पाहायला मिळाले. यावेळी "महेंद्र दळवी अंगार है बाकी सब भंगार है", अशा घोषणा देखील महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. महेंद्र दळवी यांचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला होता.


कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषदेवर  निवडून येता कामा नये


शेकापचे जयंत पाटील आणि महेंद्र दळवी यांच्यात मागील काही काळापासून बिनसल्याचे चित्र होतं.  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर सुनील तटकरे यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी महेंद्र दळवी हजर होते. यावेळी महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील हे कोणत्याही परिस्थितीत विधानपरिषदेवर  निवडून येता कामा नये, अशी विनंती तटकरे यांना केली होती. दरम्यान, आता जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर आज महेंद्र दळवी आणि कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केल्याचं पहायला मिळतंय. यावेळी आमदार दळवी हे स्वतः पाण्यात उडी मारून पोहताना दिसले तर दूसरीकडे त्यांनी चिखलात लोळत मज्जा सुध्दा घेतली.


पराभवानंतर जयंत पाटील काय काय म्हणाले?


विधानपरिषद निवडणुकीत घोडाबाजार करण्यात आला. निवडणूक निकालाचे आम्ही आत्मपरिक्षण करणार आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधीही घडलं नव्हतं. मी राष्ट्रवादीच्या 12 मतांवर निवडणूक लढत होतो, त्यातील 1 मतं फुटलं. माझं 14 मतांचं गणित होते. दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर निवडून येण्याचं गणित होतं. मात्र, राष्ट्रवादीचं एक फुटलं,काँग्रेसकडून दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं मिळाली नाहीत, अशी भूमिका जयंत पाटील यांनी आज (दि.13) मांडली. शिवाय पुढील काळात आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे जयंत पाटील स्पष्ट केले. "आमची भूमिका ठाम आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जाणार आहोत. महाविकास आघाडीतील मोठे पक्ष छोट्या पक्षांना संपवायला बसलेले नाहीत",असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.





इतर महत्वाच्या बातम्या 


Sambhajiraje Chhatrapati : विशाळगडावरील अतिक्रमावरुन संभाजीराजे आक्रमक, विनय कोरेंना म्हणाले, महायुतीत गेल्यामुळे दबाव टाकून काहीही करणार का?