Mahayuti vs Mahavikas Aaghadi, Vidhan Parishad Elcection : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हॉटेलवारीला सुरुवात झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Elcection) तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह (Uddhav Thackeray Shivsena) अजित पवारांच्या राष्ट्रवादीने (Ajit Pawar NCP) आणि भाजपने (BJP) मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीने आणि महायुतीने विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Elcection) तोंडावर असल्याने सावध पवित्रा घेतला आहे. ठाकरेंचे सर्व आमदार निवडणुकीदरम्यान हॅाटेलवर राहणार आहेत. 10,11 आणि 12 जुलै रोजी ठाकरेंचे 16 आमदार हॅाटेलवर मुक्कामी असणार आहेत. त्याचदरम्यान उद्धाव ठाकरे हॅाटेलमध्ये गाठीभेटी घेणार आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. याशिवाय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपचे आमदार देखील हॉटेलवर मुक्कामी जाणार असल्याची माहिती आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी आमदारांसाठी हॉटेल बुक करणार
विधानपरिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. 12 जुलै रोजी विधानसभेच्या शेवटच्या दिवशी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद निवडणुकीसाठी 2 उमेदवार तसेच पक्षासाठी स्वतःची हक्काची 43 मतं आहेत. अजूनही राष्ट्रवादीला 2 उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 मतांची गरज भासणार आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीला उमेदवार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित झाला आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून खबरदारी
उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर भाजपने देखील सावध पाऊलं उचलली आहेत. भाजपाच्या सर्व आमदाराना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी सर्व आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार, असल्याची माहिती आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक लागली आहे. मात्र, 12 जुलै रोजी होणाऱ्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी असू देत किंवा मग महायुती दोन्हीकडून मतांची जुळवा जुळवा करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे एक मोठा आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर असणार आहे. मतांची जुळवाजवळ नेमकी कशी केली जाणार? कोणाला किती मतं मिळणार? अपक्ष आमदारांचा नेमका रोल किती आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी काही पक्ष आपल्या आमदारांना हॉटेलवर मुक्कामी ठेवणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या