Vidhansabha Election 2024 : विदर्भातील (Vidarbha) सर्वात अनुभवी आणि सलग 5 वेळा खासदार राहिलेल्या नेत्या म्हणून वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांच्या कडे पाहिलं जातं. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) भाजपच्या सर्वेवरून भावना गवळी यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे भावना गवळीच्या राजकीय कारकीर्दवर देखील या निमित्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले होते. मात्र, त्यानंतर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट यवतमाळ गाठून भावना गवळी यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन भर सभेत दिले आणि मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) दिलेला शब्द सुद्धा पाळलाय.
नुकतेच शिंदेसेनेने भावना गवळी (Bhavana Gawali) आणि कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांचे राजकीय पुनर्वन केलंय. लोकसभेचे तिकीट न दिल्याने आता अनुभवी नेत्यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे विदर्भात ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवी खेळी खेळली असल्याच बोलल्या जात आहे. रामटेक आणि यवतमाळ वाशिममध्ये या दोन्ही नेत्यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. हीच ताकद ओळखून या दोन्ही नेत्यांना विधानपरिषदेत नव्यानं संधी दिल्या गेली आहे.
शिंदेसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेची मोठी खेळी
आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत, निवडणुकीचा काळ आहे. अशातच विदर्भातील या दोन्ही नेत्यांची नाराजी होणे हे शिंदेच्या शिवसेनाला न परवडणार असल्याने राजकीय पुनर्वसनासह विदर्भातील शिवसेनाची ताकद कायम ठेवण्यासाठी शिंदेच्या राजकीय खेळीची चर्चा आहे.
मात्र, एकनाथ शिंदे यांची हि खेळी काहीशी अंतर्गत मतभेद असलेल्या काही नेत्यांना न पटणारी असली तरी आपल्या पक्षाची ताकद आणि कार्यकर्ते तसेच पक्ष टिकवण्यासाठी केलेला या प्रयत्नासह राज्याच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान देण्यासाठी भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही राजकीय क्षेत्रात बोलल्या जाते आहे. कधीकाळी केंद्रात डंका वाजविणारे हे दोन्ही नेते आता राज्याच्या रणांगणात उतरल्याने येत्या काळात भावना गवळी आणि कृपाल तुमाने या संधीच सोन करतात का, हे पाहन महत्वाच ठरणार आहे.
राजकीय कोंडीचा परिणाम?
वाशिम-यवतमाळ लोकसभेमध्ये भावना गवळीनां उमेदवारी न देवून गमावलेली जागा आणि राजकीय पुनर्वसनामुळे भावना गवळी यांच्या राजकीय विरोधकांमध्ये कुजबुज सुरु झाली आहे. शेवटी भावना गवळी यांना लोकसभेच्या निवडणूक दरम्यान झाशी वरील केलेलं वक्तव्य हे विधानपरिषवर येऊन ठेपले असले तरी 12 विधानपरिषदेचे जागे करिता 13 उमेदवार रिंगणात असून नेमका 13 पैकी बळी कोणत्या उमेदवाराचा जाईल ते येत्या काळात कळेल. मात्र भावना गवळी यांना मिळालेली उमेदवारी अनेकांच्या जिव्हारी लागली आणि आपण आपल्या सहकारी पक्ष आणि पक्षाच्या नेत्याची केलेली राजकीय कोंडीचा परिणाम आपल्याला भोगायला लागू नये, अशी भीती या लोकसभा मतदारसंघात रंगू लागली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या