मुंबई :  लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election)  सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती खडबडून जागी झाली आहे.त्याच पार्श्वभूमीवरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आणली. या योजनेला मिळणारा महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधी महाविकास आघाडीला धडकी भरवली आहे. मात्र हीच योजना आता महायुतीसाठी डोकेदुखी ठरली आहे. कारण आधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 'लाडकी बहीण' योजनेतून मुख्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवत   क्रेडिट अजितदादांनाच दिलं. आता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या वर्षा बंगल्यावर  योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांचा फोटो गायब केला आहे.  त्यामुळे  महायुतीत लाडकी बहीण योजनेवरुन (Ladki Bahin Yojana) नवं महाभारत रंगण्याची शक्यता आहे.


 राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या चर्चेत असलेली राज्य सरकारची 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)चांगलीच चर्चेत आहे.  या योजनेच्या श्रेयवादावरून देखील मोठ्या चर्चा आणि वाद होतानाचं चित्र आहे, अशातच काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतून (Ladki Bahin Yojana) ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर  आता गणेशोत्सवादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा करण्यात आला. मात्र  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील योजनांच्या  देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो गायब आहेय    


गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई येऊन आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  महायुतीतील अंतर्गत वाद समोर यायला नकोत, असे निर्देश दिले असताना अवघ्या दोन तासातच अजित पवारांचा फोटो गायब असल्याची  माहिती समोर आली आहे.  या योजनांच्या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  मुख्यामंत्र्याचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंचा फोटो आहे.


अजित पवारांऐवजी श्रीकांत शिंदेंचा फोटो


  अजित पवार यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे यांचा फोटो असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.  ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहेत. महाराष्ट्रातील देखाव्यात देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे. उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या पोस्टरवर आहे.  ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्रच्या  नकाशातून देखील अजित पवारांचा फोटो  गायब आहे.


अमित शाहांच्या दौऱ्यात अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय 


दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते, पण चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...अमित शाहांच्या दौऱ्यात बऱ्याच ठिकाणी अजित पवारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. पण शेवटच्या क्षणी त्यांनी अमित शाहांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. त्याआधी अमित शाहा लालबागचा राजा, वर्षा आणि सागर बंगल्यावरच्या गणपती दर्शनाला गेले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते, पण अजित पवारांची अनुपस्थिती मात्र जाणवत होती. काल अमित शाह मुंबईत आले, त्यावेळीही अजित पवार उपस्थित नव्हते.


हे ही वाचा :


निवडणुकीच्या तोंडावर अभिजित पाटलांचा मास्टरस्ट्रोक, माढा मतदारसंघातील साखरसम्राटांचे धाबे दणाणले