नागपूर: राज्याचं हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter session Nagpur) उद्या 7 डिसेंबरपासून नागपूर इथं होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधकांसाठी आता सुपारी पान ठेवायला हवं. विरोधकांना विदर्भ मराठवाड्यासाशी काहीही देणं घेणं नाही हे त्यांच्या भूमिकेवरून दिसतं, असं फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षांच्या दुपारच्या पत्रकार परिषदेत काही नेते झोपले होते, जसे ते तीन राज्यात झोपले, अशी कोपरखळी फडणवीसांनी लगावली. 


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 


गेल्या काही दिवसांपासून चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. त्यामुळे हवामान विभागाने महाराष्ट्रातही (Maharashtra Weather update) पावसाची शक्यता ही त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे आणि जवळपास पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आजच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्व यंत्रणेला अलर्ट राहण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यासोबत ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय किंवा होतंय. त्याठिकाणी कुठली वाट न पाहता पंचनामे करून जी काही नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडे मागणी करण्याच्या संदर्भात देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला निर्देश दिले आहेत.


विरोधकांसाठी सुपारी पान ठेवावे लागेल


आमच्या चहापानावर बहिष्कार घातला. चहापान हे चर्चेकरता होत असतं. पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहता पुढच्या वेळेस सुपारी पान ठेवावे लागेल म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसते. 


आज विरोधी पक्षाने न येण्याची कारणे आणि जे पत्र दिलेला आहे, मगाशी मी बघितलं की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोक झोपी गेले होते. म्हणजे तीन राज्यात जसे झोपले तसे. पत्रकार परिषदेतील काही लोक झोपी गेले होते पण तशाच झोपेत हे पत्र लिहिले आहे का असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे पत्र विरोधी पक्षाने दिलं आहे.


मला आश्चर्य वाटतं नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थाने अधिवेशन या ठिकाणी होत असतं. पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाहीये. विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे, असं या पत्रावर न दिसतं. 


रद्द केलेल्या जीआरबाबत विरोधकांकडून निवदेन


जीआरचा विषय काढलेला आहे खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सहीने निघालेला जीआर हा तीन महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही, त्या विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे.


अर्थव्यवस्थेवर भाष्य


विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत. आता अजितदादा त्याच्या संदर्भात सांगतील. मी एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्यापुढे ठेवतो की अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली. तर 2013-14 साली आपला  आपली अर्थव्यवस्था ही  16 लाख कोटींची होती. आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटींची झाली. म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये अडीच पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे. त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही. अजितदादा की आकडेवारी आपल्याला सांगतीलच. पण मी एवढेच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत असे म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत पण बॅलन्स अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे. हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे.


विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल (Devendra Fadnavis on Vijay Wadettiwar)


आज आमच्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर साहेबांनी एनसीआरबीच्या अहवालाचा देखील दाखला दिला. त्यांनी ज्याचा काळाचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांच्या सरकारचाही काळ होता. तरी एन सी आर बी चा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकले पाहिजे. एनसीआरबीमध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात प्रत्येक लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचा आकलन होत असतं. 


विरोधी पक्ष नेते बोलले बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राईममध्ये ही वस्तुस्थिती नाहीये. लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये आठव्या क्रमांकावर आहोत. आठव्या क्रमांकावर आहोत हे सुद्धा भूषणावह नाही. आपण जर गुन्ह्याचा विचार केला हत्या हा अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो तर त्यात महाराष्ट्र सतराव्या क्रमांकावर आहे.


आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्येदेखील आपण राजस्थानची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे तिथे 6356 महिलांवरचे हल्ले वगैरे आहेत. ओरिसा जो अगदी छोटासा राज्य आहे तिथे 433 आहे. एकूण सगळ्या राज्यांचे न सांगता त्याला सभागृहात सांगावंच लागेल. फक्त थोडं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडे गेली पाहिजे. म्हणून तुमच्यासमोर सांगतोय. कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील. तर त्यातही महाराष्ट्र हा सातव्या स्थानावर आहे.


 बलात्कार हा गुन्हा, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 12 व्या क्रमांकावर आहे.  त्यामुळे एकूणच एनसीआरबीचा रिपोर्ट कसा वाचला पाहिजे या संदर्भातला प्रशिक्षण देखील आमच्या विरोधी पक्षाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे.


ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही त्यांनी बोलू नये 


 काही बॅनर लागलेले आम्ही बघितले की दहा दिवस अधिवेशन आहे. आता खरं म्हणजे ज्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही ते सांगून राहिले 10 दिवस अधिवेशन. त्यांना पहिले माझा प्रश्न आहे, आम्ही रोज म्हणायचो नागपूरचे अधिवेशन घ्या, अधिवेशन घ्या, पण   नागपूर अधिवेशन व्हायचं नाही. त्यामुळे त्यांनी नागपुरात अधिवेशन घेतलं नाही. आणि आम्ही तर बीएससीमध्ये देखील सांगितलं की 19 तारखेला आपण पुन्हा बीएससी घेऊ आणि त्या दिवशी किती कामकाज आपल्याला झालाय किती व्हायचंय असं सगळं अंदाज घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचा निर्णय करू. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा आरशात पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बोललं पाहिजे.


सत्तारूढ पक्ष सर्व प्रकारच्या चर्चा करता आम्ही तयार आहोत. आम्हाला असं वाटतं की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नांवर सकारात्मकतेने जाण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आमचा सत्तारूढ पक्ष हा पूर्णपणे तयारी मध्ये आहे.


VIDEO : सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद