सोलापूर : जिल्ह्यातील शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल शाह (Rahul Shah) यांच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. श्री संत दामाजी महाविदयालय या संस्थेची कोणतीही सभा न घेता सभा झाल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून त्यावर बनावट सह्या केल्याचा शाहांवर आरोप आहे. या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याच गुन्ह्यात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राहुल शाहांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नामंजूर करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होतांना पाहायला मिळत आहे. 


दरम्यान, या प्रकरणी एँड. रमेश जोशी यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ज्यात त्यांनी म्हटले होते की, 1978 मध्ये रतनचंद शिवलाल शहा यांच्या नेतृत्वाखाली श्री विदया विकास मंडळ नावाची संस्था मंगळवेढा येथे सुरु करण्यात आली होती. याच संस्थेच्या अंतर्गत श्री.संत दामाजी महाविद्यालय व श्री.संत दामाजी हायस्कूल चालवण्यात येते. तर, या संस्थेचे एँड. रमेश जोशी 1978 सालपासून संस्थापक सभासद आहे. सोबतच, सध्या श्री विद्या विकास मंडळ मंगळवेढा येथे सचिव पदावर कार्यरत आहे. असे असतांना संस्थेच्या न झालेल्या सभा कागदावर दाखवून जोशी यांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोप जोशी यांच्याकडून राहुल शाहांवर करण्यात आला होता. तसेच, त्यांनी या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यानुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. तर, याच गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी राहुल शाहांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल यांनी हा अर्ज ना मंजूर केला आहे. 


काय आहे प्रकरण...


श्री. संत दामाजी महाविद्यालयाच्या श्री विद्या विकास मंडळ या शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण सभाबाबत व बदल अहवालाबाबत राहुल शाह, अध्यक्षा शुभदा शाह, सचिव किसन गवळी, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी संस्थेचे सचिव रमेश जोशी, संचालक डॉक्टर अशोक सुरवसे यांच्या बोगस सह्या करून अहवाल सादर केला अशी फिर्याद जोशी यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. ज्यात 420,467,468,471,34 या कलमने गुन्हा दाखल झाला होता. यावर शाह यांनी पंढरपूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल यांनी हा अर्ज ना मंजूर केला आहे. आता शाह याना वरिष्ठ न्यायालयात दाद मागावी लागणार असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात आणलेले तीन प्रकल्प 10 वर्षांनंतरही अपूर्णच, सोलापूरचा विकास खुंटल्याची नागरिकांकडून टीका