मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणावर झडत आहेत. काहीही झालं तरी राज्यात सत्ता आपलीच यावी, यासाठी सर्वच नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली असताना दुसरीकडे आयएनएनएस माध्यम समूहाने निवडणुकीचा संभाव्य अंदाज सांगणारे सर्वेक्षण समोर आणले आहे. या सर्वेक्षणात कोणत्या भागात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरम्यान, मराठवाड्यात सर्वांना चकित करणारा निकाल समोर येईल, असं या सर्वेक्षणात सांगण्यात आलंय.
मराठवाड्यात एकूण 46 जागांसाठी मतदान
या सर्वेक्षणात मराठवाड्यातील एकूण 46 जागांसाठी अंदाज सांगण्यात आला आहे. येथे स र्वाधिक जागा भाजपाला मिळतील, असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आलाय. तर दुसऱ्या क्रमांच्या जागा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळतील, असं सांगण्यात आलंय. तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना राहण्याची शक्यता आहे. तर या भागात चौथ्या क्रमांकाच्या जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळू शकतात, असं आयएनएनएस माध्यम समूहाच्या सर्वेक्षणात सांगण्यात आलंय.
आयएनएनएस माध्यम समूहाच्या सर्वेक्षणात कोणाला किती जागा?
आयएनएनएस माध्यम समूहाच्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार एकूण 46 जागांपैकी साधारण 7-11 जागा काँग्रेसला मिळू शकतात. त्यानंतर भाजपाला 10-14 जागा मिळू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 6-10 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 5-9 जागा मिळू शकतात. शरद पवार यांच्या पक्षाल 7-11 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या पक्षाला मराठवाड्यात 3-7 जागा मिळण्याची शक्यता आहे. सीबीआयएम या पक्षालाही 0-4 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, वर सांगण्यात आलेल्या संभाव्य जागा फक्त सर्वेक्षणातील अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं कोणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या प्रचार चालू आहे. प्रचारात एका रात्रीतही वातावरण बदलू शकते. त्यामुळे सध्या वर्तवण्यात आलेला निकालाच्या अंदाजापेक्षा वेगळा निकाल लागू शकतो.
हेही वाचा :