Maharashtra Assembly Election 2024 : विदर्भातील मतदारराजा ज्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देता, तो पक्ष राज्यात सत्तेच्या सिंहासनी विराजमान होतो, असं राजकीय गणित असल्याचा एक समज आहे. गेल्या लोकसभेच्या 10 आणि आगामी विधानसभेच्या सर्वाधिक जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमधील मुख्य लढती एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्ष विदर्भावर वर्चस्व राखण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत. याच अनुषंगाने महायुती आणि मविआमध्ये विदर्भाच्या जागेवरून घमासान झाल्याचे बघायला मिळाले होते. ऐकुणात विदर्भ हा राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून आहे. त्यामुळे राज्यात सत्तेची किल्ली महायुतीकडे जाईल, की महाविकास आघाडीकडे, याचा निर्णय राज्यातील 158 मतदारसंघ करणार असल्याचे चिन्ह आहे.
दरम्यान, राज्यातील 158 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदे यांची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे. त्यामुळे 158 मतदारसंघाचा कौल भाजप सरस की काँग्रेस, खरी शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची, ओरिजनल राष्ट्रवादी दादांची की साहेबांची? हे बघणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
विदर्भातील राजकीय गणित काय?
विदर्भाचे राजकीय गणित बघता यंदा विदर्भात 5 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. तर मराठवाड्यात 10, पश्चिम महाराष्ट्रात 8, मुंबईत 10, उत्तर महाराष्ट्रात 4 आणि कोकणात 9 मतदारसंघात दोन्ही शिवसेना समोरासमोर आहेत. तर राज्यातील तब्बल 75 मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक 35 भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. या थेट लढतीमुळे फक्त राज्यातील सत्तेत कोण बसेल याचा निर्णयच होणार नाही, तर राज्यात भाजप सरस आहे की महाराष्ट्र काँग्रेसचे गड आहे, खरी शिवसेना शिंदेंची आहे की ठाकरेंची आणि ओरिजनल राष्ट्रवादी दादांची असणार की राष्ट्रवादी शरद पवारांची याचा निर्णय ही करणार आहे. त्यामुळे या थेट लढती निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत आणि मतदारांसाठी लक्षवेधी ठरत आहे.
विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात सर्वाधिक थेट लढत!
2019 पर्यंत महायुती आणि महाआघाडी मध्ये दोन दोन पक्ष होते. त्यामुळे प्रामुख्याने भाजप राष्ट्रवादी विरोधात तर काँग्रेस शिवसेना विरोधात निवडणूक लढवत होती. मात्र 2019 नंतरच्या बदललेल्या समीकरणात राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख अलायन्समध्ये तीन-तीन पक्ष झाले. दोन्ही बाजूचे दोन-दोन पक्ष तर एक प्रमुख पक्ष फुटून तयार झालेले दोन गट असे आहेत. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे अशी थेट लढतीचे समीकरण निर्माण झाले आहे.
अशा आहेत राज्यातील थेट लढती
मराठवाड्यातील 10, पश्चिम महाराष्ट्रातील 12, मुंबईतील 8, उत्तर महाराष्ट्रातील 6 आणि कोकणातील 4 अशा मतदारसंघात आहे.
दुसरी थेट लढत दोन्ही शिवसेना मध्ये होत आहे. शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या सेनेसमोर तब्बल 46 मतदारसंघात उभी ठाकली आहे.
तर राज्यातील 37 मतदारसंघात काका आणि पुतण्यांच्या राष्ट्रवादीचे आपापसात संघर्ष होत आहे.
दोन्ही राष्ट्रवादी विदर्भात 3 मतदारसंघात, मराठवाड्यात 6 ठिकाणी, पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 21 ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीचे संघर्ष होणार आहे. मुंबईत 1, उत्तर महाराष्ट्रात 3 आणि कोकणात ही 3 ठिकाणी काका पुतण्यांचे पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहे.
दोन्ही राष्ट्रवादीत सर्वाधिक लढत पवारांचा प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात
या शिवाय 38 मतदारसंघ असे आहे, जिथे भाजप उमेदवारांसमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत... त्यामुळे या मतदारसंघातील मतदारांचा कौल ही मत्त्वाचा ठरेल.. शिवाय 34 मतदारसंघात भाजपचे उमेदवार कधीकाळी मित्र पक्ष राहिलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी दोन हाथ करणार आहे.. 19 मतदारसंघात शिंदेंच्या शिवसैनिक काँग्रेस समोर उभे आहेत.. त्यामुळे हे मतदारसंघ ही राज्याच्या सत्तेचा निकाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.भाजप आणि काँग्रेस यांच्यातील सर्वाधिक थेट लढती विदर्भात आहे.. दोन्ही शिवसेना मधील सर्वाधिक थेट लढती मुंबई आणि कोकणात आहे.. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वाधिक थेट लढती स्वाभाविकपणे पवारांचा प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आहे.
हे ही वाचा