Nagpur District Vidhan Sabha Election 2024 नागपूर: निवडणूक म्हटली तर पैसा आलाच. मात्र, एखादा उमेदवाराच्या पाठिशी उभे राहून त्याला समाजातून स्वत:हून आर्थिक मदत करण्याचा हल्ली काळ तसा जवळ जवळ नाहीच. असे असले तरी उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे यांच्याबाबतीत हा अपवाद खरा ठरला आहे. अतुल खोब्रागडे यांच्या युवा ग्रॅज्युएट फोरमसोबत जुडलेल्या नॉर्थ नागपूर सिनिअर सिटीझन फोरमच्याच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका महिन्याचे निवृत्त वेतन खोब्रागडे यांच्या निवडणुकीसाठी दिले आहे. तसेच समाजाने नव्या नेतृत्वाला खुल्या हाताने मदत करावी, असे आवाहन देखील केले आहे.


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मदत 


या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आम्ही उत्तर नागपूरमध्ये राहतो. आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय सेवांमधून निवृत्त झालो आहोत. वयाच्या 60 ते 65 नंतरही उत्तर नागपूरचे चित्र तसेच आहे. विकास हा केवळ कागदावर असून येथील समस्यांचा सामना रोज करावा लागतोय. आपल्या अनेक बांधवांना मुलांच्या शिक्षणाकरीता चांगल्या शाळा, चांगले शिकवणी वर्ग, नोकरीच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधांच्या शोधात आजही उत्तर नागपूर आहे. तीन वर्षांआधी युवा ग्रॅज्यूऐट फोरमच्या संपर्कात आल्यावर एक चांगले काम करण्याची संधी मिळाली.


सिनिअर सिटीझन फोरमच्या माध्यमातून अनेक विकासकार्य 


युवा ग्रॅज्यूएट फोरमचे अतुल खोब्रागडे या तरूणाने आम्हाला नॉर्थ नागपूर सिनिअर सिटीझन फोरमच्या माध्यमातून एकत्र आणले आणि उत्तर नागपूरच्या समस्या सोडविण्यासाठी प्रेरीत केले. अतुलच्या सोबतीने आम्ही उत्तर नागपूरच्या अनेक समस्यांना सोडवल्या. कंन्व्हेंशन सेंटर, पाटणकर उद्यान, आवळे बाबू स्मारक, बर्डी मुख्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, इंदोरा मेट्रो स्टेशन यासारखे अनेक मुद्दे मार्गी लावलेले आहेत. अतुल खोब्रागडे यांना प्रामाणिकपणा, बाबासाहेबांच्या विचारांप्रती समर्पण, प्रशासनाकडून कामे करवून घेण्याची शैली अतिशय वाखान्याजोगी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अशा समर्पित कार्यकर्त्यासोबत आम्ही सर्व उभे आहोत असेही सांगितले.


नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12  (Nagpur MLA List)




  • काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)




  • सावनेर विधानसभा -  सुनील केदार (काँग्रेस)




  • हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)




  • उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे




  • नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)




  • नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते  (भाजप)




  • नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)




  • नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)




  • नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)




  • नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)




  • कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)




  • रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष) 




हे ही वाचा