Manij Jarange: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील नेत्यांच्या जागा वाटपाचा चर्चा नाही वेग आलाय. दरम्यान अनेक राजकीय तज्ञ अभ्यासक आणि वकिलांसोबत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बैठक घेतल्यानंतर ते पाडापाडीची भूमिका घेतात की निवडणुकीत स्वतःचे उभे राहतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.
दरम्यान जालन्यात अंतरवली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. इच्छुक उमेदवार, राजकीय तज्ञांशी चर्चा आणि विधानसभेच्या जाहीर झालेल्या तारखा या निवडणुकीच्या पटावर जरांगे त्यांची भूमिका आज जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाची निवडणुकीबाबत भूमिका काय राहणार याबाबत आज बैठक असून बैठकीतच निर्णय घेईन असा जरांगे म्हणाले. यावेळी सरकारवर जोरदार टीका करत कसा आरक्षण देत नाहीत बघूच.. सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही,असा पवित्रा त्यांनी घेतला होता.
काय म्हणाले मनोज जरांगे?
आमच्या आनंदात विष कालवण्याचं काम केलं. आमच्या लेकराच्या काळजावर यांनी आरक्षण न देऊन वार केलेत. आमच्या हातातोंडाशी आलेला घास होता. आमचा हातही छाटला आणि घासही काढून घेतला. सूड भावनेने आमच्या सगळ्या म्हणण्यावर वार केला. देवेंद्र फडणवीस यांना काहीही अधिकार नसताना आमच्या लेकरांच्या माना त्यांनी पिरगळल्या आहेत. जाता जाता आम्हाला खुन्नस देऊन आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. पण मराठ्यांना काही आरक्षण दिलं नाही. सरकारची वाट लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. दहा पावलं पुढे किंवा मागे यासाठी जे करावे लागेल यासाठी आम्ही मागे हटणार नाही. असंही ते म्हणाले.
सरकारच्या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार
राज्यात विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून इच्छुक उमेदवार आणि मराठा समाजातील लोकांशी संवाद साधल्यानंतर यावर जरांगेंना भूमिका विचारल्यावर ते म्हणाले, मला आता देणं घेणंच काय कोणाशी? सरकारने आमची घर उन्हात बांधली आहेत. महाविकास आघाडी महायुती, आम्ही करायचं काय त्यांच्या लक्षास आम्हाला काय करायचं? त्यांना सत्तेत बसायचं आहे. त्यांना मारामाऱ्या भांडण लावायचे आहेत. योजना आणायच्या. त्यांच्या या क्रूरपणाचा शेवट मराठे करणार. असं जरांगे म्हणाले. आमची भूमिका बैठकीत ठरवू असेही ते म्हणाले. हे कसं आरक्षण देत नाही ते दाखवतोच. निर्णय बैठकीतच सांगेन असं जरांगे म्हणाले.