Maharashtra Politics : शपथविधी होऊन 5 दिवस उलटले तरी महायुतीचे मंत्री बिनखात्याचेच!
Maharashtra Politics : महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून 5 दिवस होऊन गेलेत मात्र अद्यापही सर्व मंत्री बिनखात्याचेच आहेत.
Maharashtra Politics : महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी उलटून 5 दिवस होऊन गेलेत मात्र अद्यापही सर्व मंत्री बिनखात्याचेच दिसतायत… मंत्र्यांचे विभाग ठरत नसल्याने मंत्र्यांचे ना कामकाज ठरत आहेत… ना अधिकारी… त्यामुळे मंत्र्यांना देखील प्रश्न पडलाय… नेमके खातेवाटप तरी कधी होणार? खातेवाटपाला वेळ का लागतोय? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि यंदा मंत्रिमंडळाच्या यादीत कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता सर्वांनाच होती… अनेकांचा पत्ता कट झाला आणि नाराजीनाट्य देखील रंगताना दिसलं… नागपुरात शपथविधी कार्यक्रमानंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त केल्याने महायुतीचे तिन्ही नेते कोंडीत सापडल्याचं चित्र दिसलं… अशात, मागील 4-5 दिवसापासून खातेवाटप रखडल्याने नेमकं खातेवाटप कधी होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलाय…
खातेवाटप जाहीर होत नसल्याने विरोधकांकडून देखील तोंडसुख घेतलं जातंय… मागील 4-5 दिवस होऊनही मंत्र्यांना विभाग मिळत नसल्याने विरोधकांकडून टीकेला सामोरे जावे लागत आहे… सोबतच, क्रीम प्रोफाइलवरुन झालेल्या गढाओढीवर देखील विरोधक तोंडसुख घेताना दिसत आहेत…
नेमकं खातेवाटप रखडलंय कुठे?
अनेक आमदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यानंतर त्यासंदर्भात विद्यमान मंत्री आणि आमदारांनी घरचा आहेर देत नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी प्रकर्षाने नागपुरात दिसली. आणि त्यात अनेक ज्येष्ठ आमदारांच्या चेहऱ्यांवर देखील नाराजी बघायला मिळाली. शपथविधीनंतर लगेच अधिवेशन असल्याने अनेक नव्याने मंत्री झालेल्यांचे कार्यकर्ते नागपुरातच असल्याने चांगले खाते न मिळाल्याने नाराजी दिसू शकते. अशात, मंत्र्यांना विभागाचे वाटप झाल्यानंतर मंत्री आणि कार्यकर्ते अधिवेशनातच उघड नाराजी व्यक्त करु शकतात.
मंत्री न झालेल्यांची नाराजी आणि अपेक्षित विभाग न मिळाल्याने नाराजी, अशी दुहेरी अडचण एकाच वेळी येण्याऐवजी वादळ शांत करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांचा दिसतोय. सोबतच, काही खात्यांसंदर्भात अजूनही शिवसेना आणि राष्ट्रवादी जोरदार मागणी करताना दिसत आहे, त्यामुळे देखील खातेवाटपास उशिर होताना दिसतोय.
अधिवेशन 21 डिसेंबरला संपताच त्याचदिवशी रात्री किंवा 22 डिसेंबरला राजभवनाला पत्र पाठवलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. अधिवेशन संपल्याने नागपुरात कार्यकर्ते आणि मंत्र्यांचा गोतावळा नसेल… अशात, नाराजी असली तरी कोणाला लगेच प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि सोमवारी मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील अशी अपेक्षा आहे.
पहिले मुख्यमंत्री पद… नंतर मंत्रिमंडळ वाटपासंदर्भातली नाराजी आणि आता खाटेवाटपात संदर्भात घेतला जाणारा वेळ… अशात, सर्व वादळ शांत होतं आणि त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न महायुती सरकारचा दिसतोय… मात्र, अजून बराच पल्ला गाठायचा आहे… अशात, मुख्यमंत्र्यांसमोर सरकार चालवताना बरीच कसरत करावी लागणार यात शंका नाही…
इतर महत्त्वाच्या बातम्या