Ahamednagar: संगमनेर मतदारसंघात घडलेल्या प्रकारावरून सध्या राजकारणात थोरात गटविरुद्ध विखे पाटील गटाच्या वाद चर्चेचा विषय ठरलाय.  धांदरफळ येथे जाळपोळ व गाड्यांचे तोडफोड केल्याची घटना घडल्यानंतर विधानसभेच्या तोंडावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विखे पाटील यांना आव्हान दिलं आहे. 'एकदा तुलना होऊन जाऊ द्या.. कुठे दहशत आणि कुठे दडपशाही हे कळेलच. माझी तयारी आहे तुलना करण्याची 'असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना आव्हान देत चांगलंच सुनावल्याचं  दिसलं. 


अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मतदार संघात घडलेल्या प्रकारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान जयश्री थोरात यांच्याबद्दल विखे पाटील यांच्या समर्थक वसंतराव देशमुख यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  यावर 'तुम्ही मर्द होतात तर पळून कशाला गेलात?' असा सवाल थोरातांनी केलाय. थोरात समर्थकांनी जाळपोळ व गाड्यांची तोडफोड केल्याची ही घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंत वाद गेला. आता तुलना होऊन जाऊ दे असं म्हणत थोरात विरुद्ध विखे असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. 


थोरात यांचे विखेंना आव्हान, म्हणाले होऊन जाऊ द्या तुलना 


'संगमनेरमधील भाजपच्या नेत्यांना विचारा निवडणूक झाल्यानंतर आम्ही कधी राजकारण केलं?' असा सवाल करत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटलांवर तोफ डागली आहे. ते म्हणाले, 'शिर्डी मतदारसंघात विकास करण्यासाठी काम करायचा आहे तर होऊन जाऊ द्या तुलना. दोन्ही व्यक्तिमत्व दोन्ही तालुके विकास आणि जनता न्यायालयात सगळं मांडू असं म्हणत थोरात यांनी विखेंना आव्हान दिला आहे. ज्यावेळी धांदरफळमध्ये वक्तव्य झालं त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होतात. नंतर पंधरा मिनिटात लोक आले की म्हणालात आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. सुजय विखे ला विचारा महिला गेल्या आणि तो महिलांचा अवतार पाहून सुजय पळून गेले. तुम्ही जर मर्द होतात तर पळाले कशाला... 'असा टोलाही थोरात यांनी लगावला. 


जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य 


धांदरफळमधील वक्तव्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना थेट आव्हान दिले आहे. rते म्हणाले, दोन व्यक्तिमत्व दोन तालुके आणि विकास जनता न्यायालयात सगळं मांडू... आता जनतेने निर्णय घ्यायचा कोण योग्य कोण अयोग्य.. असा आव्हान बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे यांना दिले. ते म्हणाले, जिला न्याय मिळाला पाहिजे होता आणि देशमुखला अटक व्हायला हवी तो इकडच्याच भागात आहे मला कळलं.. दुसऱ्या दिवशी पुण्याला पाठवलं आणि अडचण होण्याआधी अटक व्हायला लावलं.. घाबरायच नाही.. स्वातंत्र्य मिळवायचं असेल पुढे यावं लागेल... आमच्या तालुक्यात लोक भांडतात माझ्याशी आणि प्रेम ही करतात.. मी भक्कापणे तुमच्या पाठीशी आहे.. भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे आणि जयाचा बाप आहे. त्यामुळे घाबरु नका. फसायच नाही भक्कम राहायचं आणि प्रभावती काकी यांना विधानसभेत पाठवा. असं बाळासाहेब थोरात म्हणाले.