Prakash Mahajan MNS : अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप पक्षात प्रवेश केला, यानंतर विरोधी पक्षासह राजकीय स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या, या संदर्भात मनसेच्या प्रकाश महाजनांनी देखील भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले,भाजपने ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, गाडीभर पुरावे दिले. अशोक चव्हाण यांच्यावर देखील तुम्ही आरोप केलेत, त्यांना तुम्ही पक्षात घेतलं. आमच्या पक्षात असे कोणावर आरोप नाहीत, मग आम्ही का चालत नाही? भ्रष्टाचार मिटवायला निघाली भाजपा पक्ष भ्रष्टाचाराला आपल्यात सामावून घेते आहे. शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीत केलेला अत्याचार भाजपा कसं विसरलं? अशा प्रश्नांची सरबत्ती केलीय



हिंदुत्व मानणाऱ्या पक्षासोबत युती व्हायला हवी होती - महाजन


प्रकाश महाजन पुढे म्हणाले, मनसे महाराष्ट्राच्या राजकारणात अस्पृश्य पक्ष आहे, असं म्हणतात, मात्र अस्पृश्यांना मिळणाऱ्या सगळ्या सवलती आम्हाला दिल्या पाहिजेत. देवेंद्र फडणवीस आम्हाला मैत्री हवी, पण युती नको असं म्हणतात. पण हिंदुत्व मानणाऱ्या पक्षासोबत युती व्हायला हवी होती. असं ते म्हणाले. भ्रष्टाचारी लोकांना आपल्या सामावून घेणार तर कोणाशी लढणार? मग यांच्यापेक्षा आम्ही वाईट आहोत का? आमच्या सोबत युती करायला यांना का वाईट वाटतं? असा सवाल प्रकाश महाजनांना भाजपला केलाय. कालपर्यंत ज्यांनी भाजपला शिव्या दिल्या, टर उडवली ते आज भाजपसोबत मोठ्या पदावर आहेत, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.


 


'ते पैसे आदर्श घोटाळ्यातले नाहीत ना?


प्रकाश महाजनांनी अशोक चव्हाणांना सवाल करत म्हणाले, पक्षप्रवेशाच्या वेळी अशोक चव्हाण असं म्हणाले होते, "मला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष सदस्य झाल्याची पावती दिली आणि त्या पावतीचे मी पैसे दिले. मला शंका आहे ते पैसे आदर्श घोटाळ्यातले नाहीत ना?" 



भाजपाचा नवीन ट्रेड महाजनांनी सांगितला, ते म्हणाले... 


महाजन पुढे म्हणाले,  भारतीय जनता पक्षात नवीन ट्रेड आलाय, मत मांडणारे नको, ऐकणारे हवेत. मत मांडणाऱ्या लोकांना तिथे संधी दिली जात नाही असा आरोप महाजनांनी केलाय. तसेच अशोक चव्हाणांनी जरी भाजप प्रवेश केला असला तरी ते कोणत्या तोंडाने हिंदुत्वावर बोलणार आहेत? असा सवाल देखील त्यांनी केलाय. 


 


हेही वाचा>>>


Amit DeshMukh : अशोक चव्हाणांसोबत भाजपवासी होण्याची चर्चा, बैठकीला दांडी; समोर येताच अमित देशमुख म्हणाले...