Maharashtra Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री (NCP Nawab Malik) नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेत. तर भाजपकडून (BJP) मात्र या अटकेचं जोरदार समर्थन केलं जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिलीय. 



फडणवीसांच्या काळात पुरावे समोर आले असते तर...
गुन्हा कधीच लपत नाही. आता काही पुरावे समोर आले आहेत. दाऊदच्या प्रॉपर्टी बाबत तपास सुरू होता. फडणवीसांच्या काळात पुरावे समोर आले असते तर ही वेळ आली नसती. देशविरोधी काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना भारतात आणून  त्यांना शिक्षा होण्याबाबत पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत.तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असे मलिक म्हणाले. 


मविआच्या दररोज एका मंत्र्याची नाव समोर


महाविकास आघाडी सरकारमधील दररोज एका मंत्र्याची नाव समोर येत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसला जाब का विचारत नाहीत? फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करायला कुणी अडवलं. आज 27 महिने झाले सरकार स्थापन होऊन का कारवाई केली नाही. दोषी असतील तर त्यांना कारवाई करायला कुणी अडवलं नाही


संभाजीराजे या सरकारने किती वेळा तारखा दिल्या ते आठवा.
संभाजीराजे छत्रपती यांना मराठा समाजाच्या मागण्यासाठी उपोषण करावे लागले हे दुर्दैवी. संभाजीराजे या सरकारने किती वेळा तारखा दिल्या ते आठवा. राजेंचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला तर तो आनंद क्षणभंगुर असेल. आम्ही मराठा समाजाच्या मागण्यासाठी रस्त्यावर लढत राहू, तसेच संजय राऊत यांच्या टीकेची पातळी इतकी खाली गेली आहे की त्यांच्यावर आता आम्ही बोलणारच नाही असे सांगत पाटील यांनी राऊतांवर टीका केलीय. 


राजू शेट्टींच्या आंदोलनात सहभागी होऊ


राजू शेट्टी यांना देखील उपोषण करावा लागतोय हे काही योग्य नाही. आम्ही राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असे पाटील म्हणाले. 


चंद्रकांत पाटलांचा इशारा


'ईडीच्या अटकेत असलेल्या नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवाब मलिक यांना मंत्रिपदावरून दूर करावं, अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करावं लागेल,' असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha