UP Election 2022: उत्तर प्रदेशात विधानसभा निडवणुकीत पाच टप्प्यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच उरलेल्या दोन टप्प्यांसाठी 3 आणि 7 मार्चला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिल्लक दोन टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पूर्ण ताकदीने प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल करत अखिलेश यादव (Akhilesh Yadav ) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शिवराज सिंह चौहान म्हणले की, अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये जे गुंड कोणतेही भय न बाळगता मोकाट फिरत होते, त्यांना योगी सरकारने तुरंगात टाकलं आहे. उत्तर प्रदेशमधील मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या एका प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.  

  


अखिलेश यांची औरंगजेबशी तुलना 


अखिलेश यादव यांची औरंगजेबशी तुलना करताना ते म्हणाले की, ''ज्या प्रकारे वडिलांना तुरुंगात डांबून औरंगजेबाने गादी काबीज केली होती, त्याच पद्धतीने अखिलेश यांनी वडिलांना खुर्चीवरून उठवून घरात कैद करत पक्ष काबीज केला आहे.'' कोरोना काळात भाजप सरकारच्या कामांचे कौतुक करताना चौहान म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात बनवलेली लस मिळवली आणि बाबूआने (अखिलेश यादव) रात्रीच्या अंधारात चोरून लस घेतली. स्वतः लस घेऊन ते लोकांना सांगतात ही भाजपची लस आहे. ते म्हणाले, ''योगींच्या सरकारमध्ये गुन्हेगार तुरुंगात असून त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. मात्र सपाच्या राजवटीत ते लोकांचे रक्त प्यायचे, दहशत पसरवायचे.''


अखिलेश यादव यांना 'दंगेश' म्हटले जाते - शिवराज सिंह चौहान 
 
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विरोधी पक्षातील नेते म्हणत आहेत, मोदी आणि योगींना कुटुंब नाही. ज्याचे संपूर्ण देश आणि संपूर्ण राज्य कुटुंब आहे, त्यापेक्षा जास्त दुसऱ्याचे सुख-दु:ख कोण समजू शकेल.'' ते म्हणाले, ''सपा सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. त्यामुळे अखिलेश यादव यांना 'दंगेश' म्हटले जात आहे. भाजपचे सरकार आल्यानंतर या विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चौहान यांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी मोहम्मद घोरीला सलग 18 वेळा युद्धात पराभव केले होते. 19व्यांदा घोरीने पृथ्वीराज चौहानला फसवले होते.


महत्त्वाच्या बातम्या: