Kirit Somaiya On Uddhav Thackeray: एकीकडे शिवसेनेमध्ये बंडाळी माजलेली असताना दुसरीकडे भाजपने मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता प्रभाग निहाय बैठक सुरू केल्या आहेत. आज किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. या वेळी घाटकोपर पश्चिम मधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा.. आपले प्रवक्ते संजय राऊत यांनी मला भ*** म्हटलं. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं ते म्हणाले आहेत. आम्हाला धमक्या देत आहेत, माफिया सरकार आणि त्यांचे प्रवक्ते, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.


उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ते म्हणाले आहेत की, ''मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारने केली. मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकरचा अंत जवळ आला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या.''


इतर महत्वाच्या बातम्या: