Maharashtra political crisis : बंडखोर शिवसेना आमदार आणि महाविकास आघाडी सरकारमधील संघर्ष हा दिवसागणिक वाढत चालला आहे. बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरुन रोष करू लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धास्ती वाटू लागली आहे. 


या सर्व आमदारांनी मोदी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. आता या राजकीय युद्धामध्ये भाजपने जरी आतापर्यंत सहभाग नाकारला असला, तरी त्यांचा सहभाग किती खोलवर होत आहे आता एकेक एकेक प्रकरणांतून समोर येत चालले आहे. ज्या शिवसेना आमदारांनी केंद्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती, त्यांना तत्परतेनं वाय प्लस सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्त्वाचे म्हणजे गेल्या अडीच वर्षापासून ज्या शिवसेना नेत्यांविरोधात भाजपने रान उठवले होते त्यांचाही या सुरक्षेत समावेश आहे. आमदार प्रताप सरनाईक आणि मुंबईतील शिवसेना नेते यशवंत जाधव यांचाही समावेश आहे. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या संजय राठोड यांनाही सुरक्षा बहाल करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांची जवळपास 140 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचीही दोनवेळी ईडीकडून संपत्ती जप्त झाली आहे. या सर्वांना जेलमध्ये टाकणार असल्याचे भाजप नते किरीट सोमय्या यांनी सांगितले होते.  


शिंदे गटाकडून 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव तसेच राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर हा तातडीने  निर्णय घेण्यात आला.  


या आमदारांच्या निवासस्थानी CRPF तैनात असेल 



  • रमेश बोरनारे  Ramesh Bornare

  • मंगेश कुडाळकर Mangesh Kudalkar

  • संजय शिरसाट Sanjay Shirsat

  • लता सोनावणे Latabai Sonawane

  • प्रकाश सुर्वे Prakash Surve

  • सदा सरवणकर Sadanand Saranavnkar

  • योगेश कदम Yogesh  Kadam

  • प्रताप सरनाईक Pratap Sarnaik

  • यामिनी जाधव Yamini Jadhav

  • प्रदीप जायस्वाल Pradeep Jaiswal

  • संजय राठोड Sanjay Rathod

  • दादाजी भुसे Dadaji Bhuse

  • दिलीप लांडे Dilip Lande

  • बालाजी कल्याणकर Balaji Kalyanar

  • संदिपान भुमरे Sandipan Bhumare


इतर महत्त्वाच्या बातम्या