Maharashtra Political Crisis: तब्बल अकरा महिन्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर आज (11 मे) निकाल येणार असून, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता राहणार की जाणार याबाबत देखील या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान निकालापूर्वी अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. “आज शिंदे गटाचा फुगा फुटणार आणि निकाल आमच्याच बाजूने लागणार” असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. 


यावेळी बोलतना खैरे म्हणाले की, आज निकाल येणार असून, आमच्या बाजूनेच निकाल लागावा असे सुप्रीम कोर्टाला सांगू शकत नाही. त्यामुळे आमच्याच बाजूने निकाल लावावा अशी मागणी देवाकडे केली आहे. सुप्रीम कोर्टातील निकाल आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच लागावा अशी मागणी देखील देवाकडे केली आहे. तसेच यावेळी होम हवन केले आहे. आम्ही आशावादी असून, परमेश्वर निश्चितच आम्हाला न्याय देणार आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यात यांचे जे काही प्रकरणे होती ती अतिशय गलिच्छ होते. कोण काहीही बडबड करत आहेत. शिंदे गटाचे लोकं छाती फुगवून चालत होते. मात्र आज त्यांचा फुगा फुटणार आहे. 


पुढे बोलताना खैरे म्हणाले की, तसेच न्यायालयाने अपात्र किंवा पात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष यांना दिला, तर तो अधिकारी आधीचे विधानसभा अध्यक्षांना जाईल. कारण आधी 16 आमदार बाद होईल आणि त्यानंतर नवीन अध्यक्ष निवडून येतील. पण स्वतः न्यायालयच आज निकाल देतील असे वाटत आहे. तसेच हे सर्व 16 आमदार निलंबित होणार आहेतच. तसेच त्यांचा जो काही गर्व होतं आज तो खाली होणार असल्याचं देखील चंद्रकांत खैरे म्हणाले. 


भद्रा मारुतीच्या मंदिरात विशेष पूजा...


राज्यातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी होम हवन करत निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देवाला साकडे घातले आहे. खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या मंदिरात यासाठी विशेष पूजेचे आयोजन केले होते. तर परमेश्वर आपल्याला नक्कीच न्याय देईल असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालात मराठवाड्यातील पाच आमदारांवर टांगती तलवार